नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाच्या बाल संगोपन योजनेंतर्गत नंदुरबार तालुक्यातील १८ लाभार्थ्यांना शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून लाभ देण्यात आलेला आहे. अनाथ आणि गरीब बालकांना आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबीयांच्या आधार व्हावा यासाठी शासनातर्फे ही योजना राबविण्यात येत असते.
एखाद्या बालकाचा पालकाचा काही कारणास्तव मृत्यू झाल्याने व इतर कारणांमुळे अनाथ झाल्याने अशा परिस्थितीत त्यांचे शिक्षण,आरोग्य अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते. योजनेअंतर्गत मुलांच्या संगोपन, पोषण, शिक्षणासाठी शासनाकडून आर्थिक मदत करण्यात येत असते. सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय राजपूत,महेंद्र कापडे, प्रकाश आव्हाड यांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळवा जुळव करीत जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात कागदपत्रे सादर केली.
महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात आदी असता ते पात्र ठरल्याने प्रकरण मंजूर झाले. प्रकरण मंजूर झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांनी काल शनिवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली.याप्रसंगी माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,माजी नगरसेवक दीपक दिघे आदी उपास्थित होते.
शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. परंतु योजनांची माहिती नागरिकांना नसते त्यामुळे योजनेच्या लाभ घेण्यासाठी आमदार कार्यालयात मार्गदर्शन करण्यात करण्यात येऊन प्रस्ताव तयार करण्यात येतील. पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करू
चंद्रकांत रघुवंशी,माजी आमदार








