Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्हयातील पारा पोहचला ४३.९ अंशापर्यंत

team by team
May 10, 2023
in राज्य
0
अरे बापरे : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता
नंदुरबार l प्रतिनिधी
वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली असून कमाल तापमान येत्या काही दिवसात ४२ ते ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आली.दरम्यान आज ४३.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नंदूरबार जिल्हयात आज ४३.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवस तापमान जास्त राहील. कमाल तापमानात वाढ होऊन पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात वाढ होत असल्याने शेतकरी बंधूंनी उन्हाळी भुईमूग,
बाजरी, मूग, तीळ इत्यादी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी देण्यासाठी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी. जेणेकरून पिकांना उष्म्याचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील.
फळ झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा ज्यामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्तवेळ टिकून राहील. फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, केळी व पपईसारख्या फळांचे उन्हापासून बचाव करण्यासाठी पिशवीने फळे झाकून घ्यावीत. वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा पोते पाण्याने भिजवून शरीरावर बांधावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, लोकांनी पुढील काही दिवस विशेषतः दुपारी १२ ते ४ या काळात थेट उन्हात जाणे टाळावे, शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवून मुबलक प्रमाणात कालांतराने पाणी प्यावे, अशी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

ढंढाणे येथे पोलीसांनी रोखला बालविवाह

Next Post

शहादा शहरातील तीन मजली इमारतीला लागली आग, मोठी आर्थिक नुकसान

Next Post
शहादा शहरातील तीन मजली इमारतीला लागली आग, मोठी आर्थिक नुकसान

शहादा शहरातील तीन मजली इमारतीला लागली आग, मोठी आर्थिक नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add