Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ढंढाणे येथे पोलीसांनी रोखला बालविवाह

team by team
May 10, 2023
in क्राईम
0
ढंढाणे येथे पोलीसांनी रोखला बालविवाह
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील ढंढाणे येथे आज होणारा बालविवाह रोखण्यात अक्षता समिती सदस्यांच्या यश आले आहे.
बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला आहे. 10 मे 2023 रोजीपोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मेथी ता. शिंदखेडा जि. धुळे येथील एका अल्पवयीन मुलीचा ढंढाणे ता. नंदुरबार येथील एका मुलासोबत विवाह 10 मे रोजी होणार आहे अशी माहिती मिळाली.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून  पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी सदरची माहिती नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना कळवून पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती मार्फत सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत आदेशीत केले. पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता ढंढाणे ता. नंदुरबार येथे एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसून आले. म्हणून अक्षता समितीच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या वर मुलाकडे व त्याच्या कुटुंबियांकडे मेथी ता. शिंदखेडा जि. धुळे येथील वधू मूलीबाबत विचारपूस केली असता वधू मुलगी ही त्याठिकाणी हजर होती. विवाह होण्याच्या आधीच सदर समिती सदस्य त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांना वधू मुलीच्या जन्म तारखेबाबत विचारपूस केली असता मुलीचे वय 17 वर्षे 4 महिने असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर अक्षता समितीने तेथे हजर असलेल्या वधू, मुलगा व त्याच्या नातेवाईकांना तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत चर्चा करुन त्यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई करण्यात येते याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच अल्पवयीन मुलगी व तिच्या नातेवाईकांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.  सदर बालविवाह रोखण्यासाठी ढंढाणे ता. नंदुरबार येथे गेलेल्या अक्षता समितीकडून तेथील उपस्थित लोकांना व परिसरातील आजूबाजूच्या लोकांना बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून लोकांमध्ये बालविवाह विषयी जनजागृती करण्याचे काम ऑपरेशन अक्षता समितीकडून वेळोवेळी केले जात आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. ऑपरेशन अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल असे,  पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील 615 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, पोलीस हवालदार सामुद्रे, पोलीस नाईक मनोज चव्हाण, पोलीस शिपाई सचिन सैंदाणे, राठोड अशांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मद्यपी वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक कारवाई, चार महिन्यात 348 गुन्हे दाखल

Next Post

नंदूरबार जिल्हयातील पारा पोहचला ४३.९ अंशापर्यंत

Next Post
अरे बापरे : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता

नंदूरबार जिल्हयातील पारा पोहचला ४३.९ अंशापर्यंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add