Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा खरेदी विक्री संघ बिनविरोध

team by team
May 9, 2023
in राजकीय
0
तळोदा खरेदी विक्री संघ बिनविरोध
नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा निवडणुकीत सोमवारी अर्ज माघार घेण्याचा मुदतीत 25 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणेच खरेदी विक्री संघाची निवडणूक ही देखील बिनविरोध झाली आहे.त्यामुळे तळोदा  तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे कौतुक केले जात आहे.
तळोदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ हा तालुक्यातील सहकारी क्षेत्रातील प्रमुख संस्था मानली जाते.या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 20 मे रोजी घेण्यात येणार होती. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती.खरेदी विक्री संघाचा 17 जागांसाठी तब्बल 54 जणांनी अर्ज दाखल केले होते.अर्ज छाननी नंतर एकही अर्ज बाद झाला नव्हता. त्यामुळे सर्वच अर्ज मंजूर करण्यात आले होते.सोमवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती.या दरम्यान दाखल 25 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने खरेदी विक्री संघही बिनविरोध झाला आहे.यापूर्वीच 29 जणांनी अर्ज मागे घेतले होते.शिवाय पाच जन बिनविरोध झाले होते.
बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ असे…
सहकारी संस्था.1 गोविंद पुरुषोत्तम पाटील.2 जितेंद्र रघुनाथ पाटील.3 संजीव रमेश चौधरी.4 सुभाष रामदास पाटील .
व्यक्तिशः मतदार संघ.
1 नितीन सखाराम पाटील.2 सुरेश दत्तात्रय पाटील.3 विलास कृष्णा लोखंडे.4 कांतीलाल राजाराम भापाकर.5 चंदू हरी भोई.6 पुरुषोत्तम रामदास चव्हाण.7 अरुण नत्थू मगरे.8 संजय श्रीपत पटेल.
अनुसूचित जमाती
पूनमचांद ओंकार भिल.इतर मागास प्रवर्ग. भरत कांतीलाल पाटील.
विमुक्त जाती
अविनाश प्रल्हाद भारती.
महिला प्रतिनिधी.
1 आशाबाई सुभाष पाटील.2 सुरेखा मुरलीधर सागर.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन खैरनार यांनी तर सहायक म्हणून मंगलसिंग पावरा, संघाचे मनेजर योगेश चौधरी यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडणूक पार पाडण्यासाठी आ. राजेश पाडवी,माजी आ.उदेसींग पाडवी,माजी मंत्री, ॲड. पद्माकर वळवी, डॉ.शशिकांत वाणी,माजी नगराध्यक्ष अजय परदेशी,योगेश चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली ही निवडणुक बिनविरोध पार पडली. यावेळी जितेंद्र सूर्यवंशी,योगेश मराठे,सुरेश माळी,सतीश वळवी,जितेंद्र दुबे, अनुप उदासी,कैलास चौधरी, अमोल भारती,आनंद सोनार,सूरज माळी,नारायण ठाकरे,प्रकाश वळवी,विठ्ठल बागले, गुलाबसिंग गीरासे उपस्थित होते.
पालिकेची निवडणूकही बिनविरोध करा
तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व आता तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या सहकार क्षेत्रातील दोन्ही प्रमुख संस्था तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बिनविरोध निवडसाठी ठोस प्रयत्न केल्यामुळे बिनविरोध झाल्या आहेत.साहजिकच तेथे उपस्थित उत्साही कार्यकर्त्यांनी पुढे होवू घातलेली तळोदा  नगर पालिकेची निवडणूक देखील बिन विरोध होण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची मागणी आ.राजेश पाडवी यांच्याकडे केली होती.त्यामुळे आता पासूनच इच्छुकांमध्ये धाकधूक वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक ही काही दिवसांपूर्वीच बिनविरोध म्हणून पार पडली. यानंतर  देखील खरेदी विक्री संघाची निवडणूक ही सर्वच पक्षांच्या एकमताने बिनविरोध पार पडल्याने सर्वच नेत्यांचे अभिनंदन करतो.
           आ. राजेश पाडवी
      शहादा- तळोदा मतदार संघ
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांची सुविधा उपलब्ध करा,मराठा समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे

Next Post

हे तर गजबच : पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून सिने स्टाईलने संशयित फोर व्हीलर मधून फरार

Next Post
हे तर गजबच :  पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून सिने स्टाईलने संशयित फोर व्हीलर मधून फरार

हे तर गजबच : पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून सिने स्टाईलने संशयित फोर व्हीलर मधून फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

March 27, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add