नंदूरबार l प्रतिनिधी
चारचाकी वाहन कोटीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता तो नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून सिने स्टाईलने आरोपी फोर व्हीलर मधून फरार झाल्याची घटना घडली आहे.
शहादा पोलीस ठाण्यात ३७९ कलम अंतर्गत अटक करण्यात आलेला संशयित ओमप्रकाश उर्फ ओसाराम जाट सरणेम लेहा ( रा. बायतु राजस्थान)यास अटक करण्यात आली होती.त्यास शहादा न्यायालयात काल दुपारच्या सत्रात हजर करण्यासाठी आणले असता पोलिसांना आरोपीने हिसका देऊन फोर व्हीलर गाडीत बसून फरार झाला.पूर्वनियोजित प्लॅन आखून फोर व्हीलर गाडी कोर्ट आवारात उभी केली होती.
आरोपी पोलीसांच्या तावडीतून सुटून पोलिसाला हिसका देऊन गाडीच्या दिशेने आरोपी भरधाव वेगाने गेला.तोपर्यंत गाडी चालक पळण्याचा उद्देशाने गाडी सुरू करून ठेवली होती.चालत्या गाडीत आरोपी बसला व गाडी सुसाट वेगाने चित्रपट मधील एखाद्या सिन प्रमाणे कोर्ट मधून डोंगरगाव रोडाकडे निघाली.क्षणाचाही विचार न करता पोलीस कर्मचारी गाडी मागे धावला परंतु गाडी एवढ्या सुसाट वेगाने सुटली की क्षणात नजरेआड झाली.
नंतर समजले की थोड्या अंतरावर त्या गाडीने दुचाकी स्वार सुरेश कानजी चौधरी यांना उडविले.त त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार होण्यासाठी ज्या गाडीचा वापर केला त्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने गाडी कुठली कोणाची समजू शकले नाही.याप्रकरणी उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.