नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजयाची मोहोर उमटवल्या नंतर आमदार कार्यालय परिसरात पदाधिकारी,कार्यकर्ते व उमेदवारांच्या असंख्य समर्थकांनी ढोल ताशांच्या गजर व फटाक्यांच्या आतिशबाजी, गुलालाची मुक्तहस्त उधळण करीत जल्लोशोत्सव साजरा केला.
दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास अंतिम मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे विजयी झालेले सर्वच उमेदवार मतमोजणी कक्षातून बाहेर पडल्यानंतर ढोल ताशे व फटाक्यांच्या गजरात आमदार कार्यालयावर पोहोचले.यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी विजयी उमेदवारांच्या सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.