नंदुरबार l प्रतिनिधी
बाजार समिती निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १८ पैकी १८ उमेदवार विजयी झाल्यानंतर आमदार कार्यालयाच्या बाहेर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी कार्यकर्त्यांसह डीजेच्या तालावर चांगले थिरकतांना पाहायला मिळाले.
आमदार कार्यालयाच्या बाहेर जल्लोष सुरू झाल्यानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी थेट समर्थकांमध्ये गेले. हातात भगवा झेंडा घेत डीजेच्या तालावर ठेका धरला.