नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे जिल्हा कारागृह परिसरात सुमारे २०१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा कारागृह अधिक्षक राजेंद्र देशमुख तसेच तुरंगाधिकारी श्री. पाडवी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज गायकवाड, प्रोजेक्टर चेअरमन ॲड.सुशिल गवळी, विकास तोष्णीवाल, कैलास मराठे आदी उपस्थित होते. यावेळी श्री.देशमुख म्हणाले, झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते. तसेच वृक्षांमुळे आपल्याला जीवनावश्यक घटक मिळकतात असतात. त्यामुळे आज वृक्षारोपण काळाची गरज आहे. रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा हा वृक्षारोपण स्तुत्य उपक्रम आहे. यावेळी क्लबचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी क्लबतर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम व क्लबची संकल्पना स्पष्ट केली.