नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी डॉ . विक्रांत मोरे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे .
शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ . विक्रांत मोरे यांच्या कार्याची पावती म्हणून पुन्हा त्यांच्या गळ्यात जिल्हा प्रमुख पदाची माळ टाकली आहे . त्यांच्यावर नंदुरबार आणि नवापूर विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे . शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत . डॉ . मोरे यांची नियुक्ती झाल्याने समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला .