Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उपनगर पोलीसांची धडक कारवाई, सुगंधीत तंबाखूसह 32 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

team by team
April 23, 2023
in राजकीय
0
उपनगर पोलीसांची धडक कारवाई,  सुगंधीत तंबाखूसह 32 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने सुगंधीत तंबाखूच्या वाहतुकीवर धडक कारवाई करीत 32 लाख 3 हजार रुपये किंमतीची सुगंधीत तंबाखूसह 2 संशयित आरोपी यांना अटक केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना माहिती काढून सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दि.23 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी गुजरात राज्यातून नंदुरबार मार्गे अशोक लेलँड कंपनीच्या चारचाकी वाहनातून सुगंधीत तंबाखूची वाहतूक होणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना माहिती कळवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.
मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी धानोरा ते नंदुरबार रस्त्यावर सुंददे बस स्थानकाजवळ सापळा रचला. धानोरा ता. नंदुरबार गावाकडून नंदुरबार शहराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना धानोरा गावाकडून नंदुरबार शहराच्या दिशेने एक अशोक लेलॅण्ड कंपनीचे चारचाकी वाहन भरधाव वेगाने येतांना दिसुन आल्याने पोलीस पथकातील अमलदारांनी हाताच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा देवून वाहन थांबविले. वाहनातील इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता सचिन भगवान पाटील रा. प्लॉट नं. 18 बीए शुभम पार्क, सहारा टाऊनए नंदुरबार,  रत्नदिप वासुदेव पाटील ऊर्फ राकेश किशोर राजपुत  रा. शिवाजी रोड, चैतन्य चौकदोशिया मशिद समोर, जळका बाजार, नंदुरबार असे सांगितले. उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकांनी त्यास वाहनात काय भरले आहे ? याबाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. म्हणून उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकांनी दोन्ही संशयीत व चारचाकी वाहन ताब्यात घेतले.
उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकांनी कायदेशीर प्रक्रिया करुन वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्या दिसून आल्या. सदर गोण्या उघडून पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीत तंबाखू मिळुन आली. आरोपीतास सदरची सुगंधीत तंबाखू बाबत विचारपुस केली असता त्याने गुजरात राज्यातील निझर ता. निझर जि. तापी गुजरात राज्य येथुन विकत घेवुन ते विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून जात असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेला अशोक लेलॅण्ड कंपनीचा चारचाकी वाहन ( क्र. MH 39 AD 1877) यात, 19 लाख 16 640 रुपये किमतीच्या एकुण 44 खाकी रंगाच्या गोण्या, त्यात एकुण 9680 मोठे पाकिटे त्यावर VIMAL PAN MASALA असे लिहिलेले. 2 लाख 70 हजार 600 रुपये किमतीच्या एकुण 17 पांढऱ्या रंगाच्या गोण्या, त्यात एकुण 8200 मोठे पाकिटे, त्यावर V-1 तंबाखू असे लिहिलेले.1 लाख 32 हजार रुपये किमतीच्या एकुण 5 खाकी रंगाच्या गोण्या, त्यात एकुण 1000 लहान पाकिटे त्यावर VIMAL PAN MASALA असे लिहिलेले. 33 हजार 800 रुपये किमतीच्या एकुण 07 निळ्या रंगाच्या गोण्या, त्यात एकुण 1540 पाकिटे, त्यावर V-1 तंबाखू असे लिहिलेले.  47 हजार रुपये किमतीच्या एकुण 10 पांढऱ्या रंगाच्या प्लास्टीकच्या पिशव्या, त्यात 100 पुडे त्यावर VIMAL PAN MASALA असे लिहिलेले. 3 हजार रुपये किमतीचे एकुण 100 पुडे त्यावर V-1 TOBACCO असे लिहिलेले. 8 लाख रुपये किमतीचे अशोक लेलॅण्ड कंपनीचे चारचाकी वाहन (क्र. MH 39 AD 1877) ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही संशयीत आरोपीत व एकुण 32 लाख 3 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला असून उपनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 ( 2 ) (i), 27 (3) (e) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची सुगंधीत तंबाखू ही कोणाकडून विकत आणली तसेच कोणास विकण्यास जात आहे याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून दोषींविरुध्द् कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, सहा. पोलीस उप निरीक्षक पानाजी वसावे, पोलीस अंमलदार विलास वसावे, विपुल पाटील, बाबुराव बागुल व होमगार्ड हेमंत राजपुत यांनी केली असुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

लोकशाही आघाडीच्या प्रचारास जयनगर येथून प्रारंभ

Next Post

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

Next Post
पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add