नंदुरबार l प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक सर्वसाधारण बदल्या अंतर्गत संवर्ग एक मधून लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या बोगस दिव्यांग आजार प्रमाणपत्राची पुनर पडताळणी तपासणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे, सचिव मुख्यमंत्री सचिवालय कक्ष मंत्रालय मुंबई, आयुक्त अपंग संचालनालय पुणे, बच्चु कडु माजी राज्यमंत्री शालेय शिक्षण मंत्रालय मुंबई, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई, आयुष प्रसाद शिक्षक बदली गटप्रमुख तथा सीईओ जि. प. पुणे, सहाय्यक आयुक्त विभागीय कार्यालय नाशिक, पोलिस अधिक्षक पोलिस मुख्यालय नंदुरबार, जि. प. अध्यक्षा सुप्रिया गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नंदुरबार,नंदुरबार शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. नंदुरबार, राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटनामहाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार चे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी निवेदन सादर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवेच्या शर्ती अधिनियम १९६७ अन्वये जिल्हा परिषदेच्या सेवेत कर्मचाऱ्यांची नियुक्ती होते. नियुक्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सेवा शर्तीचे पालन करणे जिल्हा परिषद सेवा शिस्त अपिल नियम १९६४ अन्वये निर्धारित केले आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील बोगस अपंग शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर खरेपणाचा आदर्श ठेवायचा ते गुरुजी खोटी प्रमाणपत्रे सादर करताना पकडले गेल्याने जिल्ह्यात खळबळ जनक वातावरण आहे. जिल्ह्यात एकाच ठिकाणी जास्त कालावधी झालेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रशासकीय बदली झाल्यास बदली दूर होणार अशी भीती शिक्षकांमध्ये होती.
नियमानुसार अपंग असलेल्या कर्मचाऱ्यांना या बदलीतून सवलत असते. याचाच फायदा घेऊन जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी अपंग असल्याची प्रमाणपत्रे शिक्षण विभागात सादर केली . दलालांच्या मदतीने ही बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याची चर्चा आहे. कर्मचा-यांच्या बदल्यांचा विषय नेहमीच चर्चेत असतो. मात्र, बदलीचा निर्णय घेतल्यामुळे अनेक शिक्षक ‘अपंग’ झाले. यामध्ये अस्थिव्यंग असलेल्या शिक्षकांची प्रमाणपत्रे अधिक असल्याचे समजले आहे. बनावट प्रमाणपत्रे सादर करणा-या शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला गेला पाहिजे. बदल्यांचा विषय गाजत असताना लोकप्रतिनिधींनी वेट अन्ड वॉचची भूमिका घेत आहे. बनावट प्रमाणपत्रे मिळवून देणा – या दलालांचे मोठी साखळी जिल्ह्यात सकिय असल्याची चर्चा आहे. मात्र, अपंग प्रमाणपत्र सादर करणा-यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर या रैकेटचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे.
या प्रकरणी खोटी प्रमाणपत्रे दाखल करणा-या डॉक्टरांवरही कारवाई करायला हवी, अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सरकारच्या योजनांचा लाभ , जसे ; बदली प्रक्रियेच्या भानगडीतून मुक्तता , इन्कम टॅक्समध्ये सूट , शिवाय दर महिन्याला दोन हजार रुपयांचा अतिरिक्त अपंग भत्ता मिळत असल्याने जिल्ह्यात बोगस अपंग शिक्षकांचे पेव फुटले आहे. संशयित शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचा पडताळा करणे सुरू असून, एका शिक्षकांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे यातून समोर आले आहे. प्रमाणपत्रांची मुदत संपलेली असताना योजनांचा लाभ घेणे, अपंग प्रमाणपत्राच्या मूळ प्रती यांच्यात तफावत , फेरफार केल्याच्या गंभीर बाब समोर येत आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीव्दारे होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पहिल्या टप्यात बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती. शिक्षकांनी आपण संवर्ग एकमध्ये बसल्याबाबतचे अर्ज केले. संवर्ग एकमध्ये गंभीर आजारी , दिव्यांग अशा बाबींचा समावेश आहे. आपली बदली होवू नये किंवा हवी ती शाळा मिळावी , यासाठी शिक्षकांकडून बोगस कागदपत्रे जोडल्याचा संशय आणि तक्रारी आल्याने संबंधित शिक्षकांची जे . जे . हॉस्पिटल मुंबई येथे दिव्यांग शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत नोटीसा देवून तपासणी करण्यात यावी . जिल्ह्यात विविध भागात अनेक धडधाकट मंडळींनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या जागा, बस प्रवासात सूट, मध्य व इतर लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
त्यामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत होता. जिल्ह्यात कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर आहेत. संवर्ग एकच्या बदल्यामध्ये अनेक दिव्यांग व दुर्धर आजाराची प्रमाणपत्र आढळले आहेत . त्यातील पुनर प्रमाणपत्राची फेर तपासणी जे . जे . हॉस्पिटल मुंबई रुग्णालयात चौकशीसाठी पाठवण्यात यावे. आणि याच आधारे शिक्षक बोगस आढळून येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन शासकीय सेवेतून बडतर्फची कार्यवाही करावी. संवर्ग एकमध्ये दिव्यांग , असाध्य आजार , तसेच ५३ वर्षांपुढील शिक्षकांच्या बदल्या प्राधान्याने होतात .
सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडलेले आहे. दिव्यांग, जास्तीची टक्केवारी , शस्त्रक्रिया , गंभीर आजार असल्याचे प्रमाणपत्र दाखवून बदलीचा लाभ घेणाऱ्यांची चौकशी करावी अशी तक्रार निवेदनात करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये काही शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देऊन बदलीचा लाभ घेतल्याच्या तकारी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी न झाल्यास या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार २८ एप्रिल रोजी प्रहार शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी दिला आहे.

दिव्यांगाला न्याय मिळणार दिव्यांग बोगस शिक्षक मोहिमेला खऱ्या अर्थाने यश मिळेल. त्यामुळे खऱ्या दिव्यांगाला न्याय मिळणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या बदल्यामध्ये अनेक शिक्षक संवर्ग एक दिव्यांग व दुर्ग दुर्धर आजारा असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. आजार दिव्यांगत्व आणि त्यांच्याकडील प्रमाणपत्राची पुनर तपासणी जे. जे हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात यावी. शिक्षक बोगस निघाल्यास त्या शिक्षकांवर प्रशासकीय कार्यवाही करून सेवेतून बडतर्फ करावे.गोपाल गावीत,जिल्हा अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार









