नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळ्याहून – सुरतकडे जाणार्या बस, ट्रेलर व ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि.16 एप्रिल रेाजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धुळे-सुरत महामार्गावर कोंडाइबारी घाटात भरधाव वेगातील बस क्रमांक (एमएच 39-बीएल 3745) ने समोरुन येणार्या ट्रेलर (क्रमांक सीजी 94एमई 2848) व ट्रक (क्रमांक केएल 205 सी 7198) यांना धडक दिली.
या भीषण अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत चालक जितेंद्रकुमार उमाशंकर सरोज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ अरुण कोकणी करीत आहेत.








