नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुका विधायक समिती संचलीत माध्यमिक विद्यालय शेजवा पो पिंपळोद शाळेत “भारतरत्न संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शेजवा शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील होते. यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्य, गाणे,काव्य इत्यादी कार्यक्रम सादर केले . सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे उपशिक्षक रामानंद बागल यांनी केले .यावेळी शाळेचे दत्तू पाटील यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपट विषयी सविस्तर माहिती सांगितली, तर शाळेचे उपशिक्षक विजय पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध घटनान विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार शाळेचे उपशिक्षक दीपक वळवी यांनी मानले सदरील कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक हारून खा शिकलीकर, संजय बोरसे, लिपिक श्रीमती नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते .