म्हसावद l प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२जयंतीनिमित्त धडगाव तालुक्यातील खुंटामोडी गावी रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले. कोविड नंतर शहरात रक्तदान दाते मिळत नाहीत, अशा वेळी सातपुड्यातील एका छोट्याशा गावात अभुतपुर्व रक्तदानातून बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना देण्यात आली.
शंभराहून अधिक दाते रक्तदानासाठी आलेत. वैद्यकीय तपासणी नंतर ४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.खुंटामोडी गावातील रक्तदान प्रथम स्वतः करून यशस्वीतेसाठी सरपंच दत्तू वळवी, उपसरपंच गेमलसिंग वळवी, गंगाराम परमार, मोगा परमार, धडगाव पोलिस ठाणे पी.एस.आय. राहुल पाटील, पोलिस पुष्पेंद्र कोळी, धडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक तथा गटनेते विजय ब्राम्हणे व सौ.साधना ब्राम्हणे सपत्नीक , नगरसेवक रघूनाथ पावरा, पुरूषोत्तम पावरा ,शिवराम वळवी, याहा मोगी आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था धडगाव येथील पदाधिकारी विठ्ठल कदम, डॉ.तानाजी पावरा,
सहकारी रंजना नवेज, बार्टी संस्थेचे समतादूत ब्रिजलाल पाडवी सुरवाणी आश्रमशाळा कर्मचारी मुकेश गावित, बळवंत पाडवी, सुभाष वळवी, अक्राणी आश्रमशाळा शिक्षक सतिश सोनवणे, पंकज गांगुर्डे, नामदेव ननवरे, दिपक बागुल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरवाणी कर्मचारी भिका पाडवी, मंगेश पाडवी, माध्यमिक शाळा खुंटामोडी येथील सर्व शिक्षक ,मुख्याध्यापक व कर्मचारी, RBSK धडगाव टिम १च्या pharmacist मानसी धुमाळ , धडगाव चे समुपदेशक राकेश पावरा, वसंत राठोड , ज्योती वळवी,खुंटामोडी गावातील गावकरी दिलवरसिंग वळवी, अनिल वळवी, संग्रामसिंग वळवी, शिवाजी नाईक, विनोद वळवी, वालजी राठोड, सुनिल नवेज,मोहन परमार, दिलीप परमार, सुनिल परमार, सुरेश राठोड, शशिकांत परमार, सिद्धार्थ परमार, दिनेश नवेज, अमर नवेज, मनोज नवेज, राजेश राठोड , रविंद्र राठोड,अनंत राठोड, मनोहर परमार, अनिल नवेज,गोवा परमार, ईश्वर शिंदे यासह अनेकांनी रक्तदानातून यशस्वीतेसाठी बहुमोल परिश्रम घेतले.
प्राथमिक आरोग्य केंद्र खुंटामोडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सायसिंग पाडवी, डॉ. मालती ठाकरे
सह कर्मचारी, धडगाव, डॉ.निलिशा पाडवी , डॉ. रियाज पिंजारी, मानसी ढुमाळ, संगिता शिंदे, ग्रामीण रूग्णालय धडगाव कर्मचारी सय्यद खाटिक, राजेश वसावे, राकेश पावरा व जिल्हा रुग्णालय रक्त केंद्र नंदुरबार टिम जयेश सोनवणे, संतोष ठाकूर, ईश्वर वसावे, निलेश प्रधान, गोसावी नाना यांनी रक्त संकलनासाठी उत्तम कामगिरी बजावली.