Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा

team by team
March 22, 2023
in शैक्षणिक
0
शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा
शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा जि.नंदुरबार येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विद्यापीठ स्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या स्पर्धेचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शन अंतर्गत उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल, महाविद्यालयाचे सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे समन्वयक डॉ.प्रशांत आर.तोरवणे व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.मृणाल जोगी यांनी केले होते.या विद्यापीठस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे उद्घाटन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक विनायक सावळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ.अविनाश निकम, डॉ.डी.एम.गांगुर्डे, प्रा.एस.एस.पवार, डॉ.मिलिंद पाटील, डॉ.आर.एस.माळी, डॉ.वजीह अशर, प्रा.राहुल पाटील, डॉ.तुषार पटेल, प्रा.दिनेश पाटील, प्रा.भूषण पाटील, प्रा.विकेश पावरा, दिनेश शिंदे, हर्षल मोरे, सुरेंद्र वळवी आदिंचे सहकार्य लाभले. सदर स्पर्धा परीक्षा 50 बहुपर्यायी प्रश्नोत्तरांच्या साह्याने घेतली गेली.
या स्पर्धेला नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विविध विद्याशाखेचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी सहभागी झाले होते.स्पर्धेनंतर निकाल जाहीर करण्यात आला. यात चौधरी रुपाली प्रल्हाद या विद्यार्थीनीने 3075 रुपयांचे प्रथम, चौधरी कल्पेश धारु या विद्यार्थीने 2075 रुपयांचे द्वितीय, तर चिनावलकर प्राजक्ता नितीन व घोडराज जागृती शिवाजी या विद्यार्थीनीना प्रत्येकी 800 रुपयांचे तृतीय पारितोषिक विभागून वाटप करण्यात आले.
वरील पारितोषिक प्राप्त सर्व विद्यार्थी हे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा जि.नंदुरबार येथील असून द्वितीय वर्ष विज्ञान शाखेचे आहेत. सर्व पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी अभिनंदन केले. सदर परीक्षेचे कामकाज महाविद्यालयाचे सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे समन्वयक डॉ.प्रशांत आर.तोरवणे यांनी पाहिले.
बातमी शेअर करा
Previous Post

सातपुडा साखर कारखान्याने शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी नोंद बिगर नोंद ऊस गळीताबाबत केले असे आवाहन

Next Post

भिमहोत्सव समिती नंदुरबार शहर २०२३ कार्यकारिणी गठीत

Next Post
भिमहोत्सव समिती नंदुरबार शहर २०२३ कार्यकारिणी गठीत

भिमहोत्सव समिती नंदुरबार शहर २०२३ कार्यकारिणी गठीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add