नंदुरबार | प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील तामसवाडी येथील ज्ञानेश्वर भिमराव सोनवण हे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जखाणे ता.शिंदखेडा या ठिकाणी कलाशिक्षक म्हणून गेली पंधरा वर्षे कार्य करीत आहेत.त्यांनी नखचित्राच्या माध्यमातून कागदावर श्रीमद्भागवत गीता नखाने लिहून पूर्ण केली व या कामाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली असुन कोरोना काळात आपल्या नखांच्या साह्याने भगवद्गीता कागदावर साकारली. भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या एकूण ७०० आहे .एका श्लोकात दोन ओळी त्यामुळे सर्व ओळींची संख्या १४०० इतकी होते रेकॉर्डच्या आयोजकांनी सर्व सखोल पडताळणी झाल्यावर रेकॉर्ड झाल्याचे कळवले असुन नुकताच श्री.सोनवणे यांना ऍचीवर पॅक प्राप्त झाला.
ज्ञानेश्वर भिमराव सोनवण हे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जखाणे ता.शिंदखेडा या ठिकाणी कलाशिक्षक म्हणून गेली पंधरा वर्षे कार्य करीत आहेत.त्यांनी कोरोना काळात आपल्या नखांच्या साह्याने भगवद्गीता कागदावर साकारली. भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या एकूण ७००आहे. एका श्लोकात दोन ओळी त्यामुळे सर्व ओळींची संख्या १४०० इतकी आहे.याबाबत विविध पेपरांचे कात्रण यांची दखल घेत श्री. सोनवणे यांच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेत त्यांना नुकताच ऍचीवर पॅक दिला आहे.
या कार्यासाठी श्री.सोनवणे यांचे वडील भीमराव बळीराम सोनवणे तर आई कै. सुशीलाबाई भिमराव सोनवणे यांनी नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले ज्यांच्याशिवाय रेकॉर्ड शक्य नव्हता असे सांगत नूतन माध्यमिक विद्यालय खोंडामळ येथे अध्यापिका असलेल्या त्यांच्या सहचारिणी शशिकला ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पाठिंबा आणि प्रेरणा दिली असे सांगीतले.
सन १९९७ ला पिंपळनेर येथील पुंडलिक सुपडू सूर्यवंशी यांनी श्री. सोनवणे यांना उत्तमपणे व्यवसायाचे धडे दिलेत त्यामुळेच साक्रीकर जगन्नाथ जाधव व मोहन जाधव यांच्याकडे उत्तमपणे तीन वर्ष कारागिरी केली.त्यादरम्यानच श्री सुर्वे या नखचित्रकाराची भेट झाली त्यांच्याकडुन ज्ञानेश्वर सोनवणे यांना ही कला शिकली. कोरोना काळ मानवी समुदायाला खूप दुःख देऊन गेला परंतु याच कोरोणा काळामध्ये नखचित्रातून भगवद्गीतेचे लेखन झाले याचा सोनवणे यांना विशेष आनंद आहे पूर्ण लेखनाला दोन ते अडीच वर्षाचा कालावधी गेला या कालावधीचा सदुपयोग करता आला.याबाबत त्यांना समाधान व्यक्त केले.