नवापूर l प्रतिनिधी
शहरातील मध्य भागात असलेले बसस्थानक परिसरात प्रवाश्यांसाठी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते पणींपोईचे उदघाटन करण्यात आले आहे.
नवापूर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश येवले हे गेल्या अनेक वर्षा पासून लोकसहभागातून प्रवाश्यांसाठी पिण्याचे शुद्ध व गार पाणी जारच्या माध्यमातून लोकांची तहान भागवली जात असून ही सेवा आज पासून सलग तीन महिने अविरत पणे सुरू राहनार असून अश्याच प्रकारे शहरात गजबजलेल्या डायमंड हॉटेल जवळील शीतल सोसायटी परिसरात ही सेवा ग्रामीण भागातील नागरिकां साठी उपलब्ध केली असल्याची माहिती मंगेश येवले यांनी दिली आहे. या वेळी त्यांनी दानशूर नागरिकांना या सेवेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन ही केले आहे.
नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते फित कापून पाणींपोईचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी माजी उपनगराध्यक्ष अय्युबभाई बलेसरिया, महाविजवीतरणचे उपअभियंता हेमंत बनसोड,सहायक पोलिस निरिक्षक निलेश वाघ आगार प्रमुख श्री.जगताप , माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे तसेच आगार अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार /कवी विजय बागुल, महेंद्र चव्हाण,प्रकाश खैरनार, मयूर आहुजा आदी उपस्थतीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पवार यांनी केले तर आभार मंगेश येवले यांनी मानले.








