Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बंदुकीचा धाक दाखवून भालेर येथील शेतकऱ्यांना लुटणारे दरोडेखोर 30 तासातच जेरबंद, 21 लाख लाखाचा मुद्देमाल हस्तगत

team by team
March 12, 2023
in क्राईम
0
बंदुकीचा धाक दाखवून भालेर येथील शेतकऱ्यांना लुटणारे दरोडेखोर 30 तासातच जेरबंद, 21 लाख लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नंदूरबार l प्रतिनिधी

बंदुकीचा धाक दाखवून भालेर येथील शेतकऱ्यांना लुटणारे दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडून 30 तासातच जेरबंद, 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल गंगाराम पाटील व त्यांचा भाऊ हसंराज दगाजी पाटील दोन्ही रा- भालेर ता जि – नंदुरबार हे दोन्ही शेतकरी त्यांचा कापुस गुजरात राज्यातील कडी येथे विकुन दि. 10 मार्च 2023 रोजीच्या रात्री 1.30 वा. सुमारास दुचाकीने त्यांच्या घरी जात असतांना नंदुरबार शहरातील भालेर रोडचे होळ गावाकडे जाणाऱ्या फाटयाजवळ त्यांच्या गाडीच्या पुढे एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहनातून आलेल्या चार अनोळखी अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीसमोर पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन आडवे लावून फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने मिरचीपूड भिरकावून 13 लाख 94 हजार रुपये रोख रक्कम बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेतले म्हणून सुनिल गंगाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 394,34 सह आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल आहे.

 

 

सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व पोलीस अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

 

 

घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर व संवेदनशील होता. गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून गुन्ह्याबाबत फक्त एवढीच माहिती मिळालेली होती की, गुन्ह्यातील आरोपीतांकडे अंधारात अर्धवट नंबर प्लेट दिसली. MH-04 क्रमांकाची एक पांढऱ्या रंगाची ती स्वीफ्ट डिझायर गाडी होती अशी त्रोटक माहिती मिळाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी लावण्यात आली, परंतु रात्रीचा वेळ असल्याने अंधाराचा फायदा घेवून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

 

 

वर्षभर शेतात कष्ट करुन पैसे जमवणाऱ्या शेतकऱ्याच्या पैश्यांवर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होतेच, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे 6 वेगवेगळे पथके तयार करुन गुजरात, मध्य प्रदेश राज्यात रवाना करुन दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

 

 

स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी. सी. टी. व्ही. तपासून अज्ञात आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, घटना ही निर्जन स्थळी व अंधारात झालेली असल्यामुळे सी.सी.टी.व्ही. देखील जवळपास मिळणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आरोपीतांची किंवा वाहनांची निश्चित माहिती मिळून येत नव्हती.

 

 

घटनेबाबत माहिती कळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे घटनास्थळावर स्वतः दाखल झाले होते. गुन्ह्यातील फिर्यादी सुनिल गंगाराम पाटील व त्यांचा भाऊ हसंराज दगाजी पाटील व त्यांचे कुटुंबीय हे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना घटनेच्या दिवशी घटनास्थळावरच पहाटे भेटले असता दोन्ही शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची सर्व परिस्थिती पोलीस अधीक्षक यांना सांगितल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी दोन्ही शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले की, “तुमच्या मेहनतीचे पैसे चोरणाऱ्या चोरांना आम्ही लवकरच बेड्या ठोकू व तुमचे चोरी झालेले पैसे देखील हस्तगत करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करु” असे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी नंदुरबार शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक असल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्तात व्यस्त होते.

 

 

दि. 11 मार्च 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भालेर रस्त्यावर शेतकऱ्यांना लुटणाऱ्या संशयीत आरोपीतांचे फिर्यादी सोबत गुजरात राज्यात कापुस विक्रीसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचे संबंध असण्याची शक्यता आहे. तरी त्यास ताब्यात घेवून सखोल विचारपूस करा असे सांगून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना तपासाबाबत सविस्तर सुचना दिल्या.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी शेतकरी माल घेवून गेलेल्या गाडीचा चालक व सोबत असलेल्या कापुस व्यापाऱ्याला 11 मार्च 2023 रोजी अतिशय गुप्तपणे व कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता कापुस व्यापारी उमेश पाटील हा विचारपूस करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले, परंतु स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदारांनी गुन्हा घडल्यापासून तपासलेले सी.सी.टी.व्ही. फुटेज व संशयीत उमेश पाटील हा सांगत असलेली हकिकत यात तफावत आढळून आली. यावरून विचारपूस करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांना उमेश पाटील बाबत अधिक संशय आला. त्याची नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तो देत असलेल्या माहितीतील विसंगती त्याच्या लक्षात आणून देवून त्यास बोलते केले. त्यावेळी संशयीत उमेश पाटील याने सदरचा गुन्हा त्याचा धामणगांव जि. धुळे येथील नातेवाईक चैत्राम पाटील व त्याचे इतर तीन साथीदारांच्या मदतीने केला असल्याची सविस्तर माहिती दिली.

 

 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली 3 पथके तयार करुन संशयीत उमेश पाटील याने दिलेल्या माहितीवरून उर्वरीत संशयीत आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ धुळे जिल्ह्यातील धामणगांव गाठून सर्व आरोपीतांना एकाच वेळी सापळा रचून ताब्यात घेण्याचे नियोजन केले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या तिन्ही पथकांनी संशयीत आरोपीतांच्या घराबाहेर सापळा रचून एकाचवेळी तिन्ही आरोपीतांना शिताफीने चैत्राम ऊर्फ झेंडु राजधर पाटील, सागर ऊर्फ बंटी सुभाष पाटील, दिपक ऊर्फ बबलू सुभाष पाटील तिन्ही रा. धामणगांव ता.जि. धुळे असे सांगितले. तसेच त्यांना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्यातील बंदुकीचा धाक दाखवून जबरीने हिसकावलेले पैसे, बंदुक दिपक ऊर्फ बबलु यांचे शेतातील झोपडीमध्ये लपवून ठेवले असल्याबाबत सांगितले. तसेच गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हे चौथा साथीदार धुळे जिल्ह्यातील शिरुड गावातील राहुल भोई नावाच्या तरुणाचे असल्याचे सांगितले.

 

 

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिपक ऊर्फ बबलू याचे शेतातील झोपडीमधून वापरत्या दुधाच्या गुलाबी रंगाच्या कॅनमधून 13 लाख 26 हजार 540 रुपये रोख व 25 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी बनावटीचे पिस्तुल, 1200 रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत केले. तसेच एका पथक मिळालेल्या माहितीवरून धुळे जिल्ह्यातील शिरुड गावात गेले. गावात राहुल भोई नावाच्या तरुणाची माहिती घेत असता गावातील इसमाने एका ओट्यावर बिनधास्तपणे बसलेल्या तरुणाकडे बोट दाखवून तो राहुल भोई असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तरुणास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव राहुल बळीराम भोई रा. शिरुड ता. जि. धुळे असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात 200 रुपये किमतीचा एक लोखंडी धारदार चाकू मिळून आला. त्यास गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनाबाबत विचारपूस केली असता घराच्या बाजूला झाकुन ठेवलेल्या स्वीफ्ट डिझायर गाडीकडे बोट दाखवून हीच गाडी गुन्हा करतेवेळी वापरली असल्याचे सांगितले. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ते वाहन कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केले. सदर गाडीच्या नोंदणी क्रमांकाबाबत माहिती घेण्यात येत आहे.

 

 

ताब्यात घेण्यात आलेलेउमेश आत्माराम पाटील रा. जुनवणे ता. जि. धुळे, चैत्राम ऊर्फ झेंडु राजधर पाटील, सागर ऊर्फ बंटी सुभाष पाटील , दिपक ऊर्फ बबलू सुभाष पाटील तिन्ही रा. धामणगांव ता.जि. धुळे, राहुल बळीराम भोई रा. शिरुड ता. जि. धुळे व त्यांचेकडून जप्त करण्यात आलेले 13 लाख 26 हजार 540 रुपये रोख, 25 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी बनावटीचे पिस्तुल, 1200 रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस, 200 रुपये किमतीचा एक लोखंडी धारदार चाकू, 50 हजार रुपये किमतीचे 5 विविध कंपनीचे मोबाईल व गुन्हा करतेवेळी वापरलेले 7 लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकुण 21 लाख 2 हजार 940 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत तपास करीत आहोत. अशा रितीने नंदुरबार पोलीसांनी अवघ्या 30 तासात गंभीर गुन्हा कामगिरी बजावली आहे.

 

 

सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील व संपुर्ण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

 

 

सदरचा गुन्हा हा अत्यंत संवेदनशिल व शेतकरी बांधवांच्या भावनांशी निगडीत असल्यामुळे त्याची उकल होवून गुन्ह्यात चोरी गेलेला माल लवकरात लवकर परत मिळविणे आवश्यक होते. घटनास्थळावर भेट दिल्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांना विचारपूस करीत असतांना बंदुकीचा धाक दाखविला असल्याचे सांगितले होते. गुन्हा उकल झाल्यानंतर संशयीतांकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याने फिर्यादी व साक्षीदार यांनी सांगितलेली बाब खरी निघाली.
असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’चे जी-२० पाहुण्यांनाही वेड

Next Post

प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा जीवन गौरव हिंदी सेवा पुरस्कार घोषित

Next Post
प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा जीवन गौरव हिंदी सेवा पुरस्कार घोषित

प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा जीवन गौरव हिंदी सेवा पुरस्कार घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add