नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील एकता नगर परिसरातील एकता युवक व्यायाम शाळा तर्फे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात परिसरातील युवकांनी रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत सामाजिक बांधिलकी जोपासली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी माजी नगरसेवक किरण रघुवंशी,माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, माजी सभापती कैलास पाटील, उपनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाने उपस्थित होते.शिबिरात ५० रक्तदात्यानी स्वयंस्फूर्तिने रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी येडगे, अमर वळवी, पप्पू मराठे, किशोर लवटे, दिपक ठाकरे, करण ठाकरे, अभिषेक मिस्तरी, विशाल बोरसे, गुड्डु तंबोळी, किरण आल्हाट यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढ़ीचे महेंद्र चव्हाण,जयेश सोनवने यांनी रक्त संकलन केले. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्याने उपस्थित होते. शिवजयंती निमित्त एकता युवक शाळेने राबवलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या युवकांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.








