नंदुरबार l प्रतिनिधी
पोलिस अधिक्षक कार्यालय येथे आमरण उपोषणास बसू नये अशी नोटीस बजावली असतांनाही मनाई आदेशाचे उल्लंघन करुन उपोषणास बसल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील आदर्श नगर येथील संतोष गोरख पानपाटील यांना पोलिस अधिक्षक कार्यालय येथे आमरण उपोषणास बसू नये याबाबत शहादा पोलिस ठाण्यातर्फे नोटीस बजावली होती. तरी संतोष पानपाटील यांच्यासह दोघाजणांनी मनाई आदेशाचे उल्लंघन करुन पोलिस अधिक्षक कार्यालय येथे उपोषणास बसले.
याबाबत पोहेकॉ.रविकांत बागले यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. रायसिंग वळवी करीत आहेत.








