शहादा l प्रतिनिधी
शहादा येथील श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशनतर्फे सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या दि .१८ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे .
सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्याला माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत . अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशनच्यावतीने दि .१८ रोजी सकाळी ११ वाजता स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रेरणादायी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच लोणखेडा येथील व्यापारी संकुलाचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे . यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट , राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील , राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील , आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी , नवी दिल्ली येथील सुरेंद्रसिंह नागर , माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन , माजी मंत्री अमरिशभाई पटेल , जयकुमार रावल , खा.रक्षा खडसे , खा.हीना गावित , आ.राजेश पाडवी , आ.डॉ.विजयकुमार गावित , आ.काशिराम पावरा , आ.शिरीष नाईक , आ.संगिता पाटील , आ.डॉ.सुधीर तांबे , आ.सुनिल भुसार , माजी आ . चंद्रकांत रघुवंशी , माजी आ.शिरीष चौधरी , भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , माजी आ.राजवर्धन कदमबांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . सदर सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पी . के.पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील , सचिव प्राचार्य मकरंद पाटील, श्रीमती कमलताई पाटील , पी.आर. पाटील यांनी केले आहे.