तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथे बस स्थानकावर महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ सप्टेंबर रोजी प्रवासी महासंघाच्या सुचना फलक व प्रवासी महासंघाचे डिजिटल बँनरचे अनावरण शहादा-तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ.अजय सोनवणे, नाशिक विभाग संघटक संजय शुक्ला, सहसंघटक ॲड. सुरेंद्र सोनवणे, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष किर्तीकुमार शहा, तळोदा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, सचिव पंडीत हिरामण चौधरी, संघटक राजेश तुकाराम पटेल, नंदुरबार जिल्हा संघटक प्रा.आर.ओ.मगरे, तळोदा तालुकाध्यक्ष अशोक सुर्यवंशी, तळोदा तालुका उपाध्यक्ष डॉ.प्रा.संजय शर्मा, नंदुरबार तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, शहादा तालुका अध्यक्ष उदय निकुम, नंदुरबार जिल्हा आयोगाच्या माजी.न्यायाधीश सौ.निता देसाई, ॲड. निलेश देसाई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.