नंदुरबार l प्रतिनिधी
कलाशिक्षक व चित्रकार धनराज पाटील यांनी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी झाडाच्या रूपात श्रीगणेशाची स्थापना केली.अनेक मान्यवरांनी आरती केली व दर्शन घेतले. विसर्जनही त्याच प्रकारे पर्यावरणाचा संदेश देत व्हावे यासाठी धनराज पाटील यांनी शहरातील कलाशिक्षक मित्रांना आमंत्रित करून केलेले रंगकाम पाणी व कापडाने पुसून जागेवर विसर्जन करण्यात आले व प्रत्येकास झाडाचे रोप देऊन वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.