नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबारातील किराणा दुकानादाराची कापडी पिशवी लांबवित चोरटयांनी ४० हजार रोकड चोरून नेल्याची घटना हाटदरवाजा परिसरात घडली. याप्रकरणी अनोळखीविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील जयहिंद कॉलनीत राहणारे शंकर मोहनदास नाथाणी यांचे हाटदरवाजा परिसरात हरिदेव किराणा दुकान आहे. शंकर नाथाणी यांनी दुकानाच्या ओटयावर कापडी पिशवी ठेवून दुकानातील लाईट बंद करण्यासाठी आत गेले. यावेळी संधी साधत चोरटयांनी हातसफाई करीत पैशांची पिशवी लांबवून सुमारे ४० हजार रूपयांची रोकड चोरून नेली आहे.
याबाबत शंकर मोहनदास नाथाणी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरटयांविरूध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ.जगदिश पावरा करीत आहेत.