Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्तुत्य उपक्रम ; एच.आय.व्ही सह जगणार्‍या सहा  जोडप्यांचे जुळल्या रेशीमगाठी

team by team
February 25, 2023
in सामाजिक
0
स्तुत्य उपक्रम ; एच.आय.व्ही सह जगणार्‍या सहा  जोडप्यांचे जुळल्या रेशीमगाठी

नंदुरबार | प्रतिनिधी

 

नंदुरबार तालुक्यातील मेघ मल्हार सिटी येथे नेटवर्क ऑफ बाय पिपल लिंव्हींग विथ एच.आय.व्ही एड्स संस्थेतर्फे एच.आय.व्ही सह जगणार्‍या अविवाहित जोडप्यांसाठी राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ६५ अविवाहित, घटस्फोटीत विधवा व विधुर एच.आय. व्ही संसर्गित वधू-वरांची नोंदणी व परिचय करण्यात आला.त्यांपैकी ६ जोडप्यांचे लग्न जुळवून देण्यात आले.

 

 

नेटवर्क ऑफ बाय पिपल लिंव्हींग विथ एच.आय.व्ही एड्स संस्था नंदुरबार ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार व धुळे जिल्ह्यात एच.आय.व्ही संसर्गित लोकांना आधार देणे ,उपचार, समुदेशन, त्याचा पाठपुरावा करने तसेच निमशासकीय शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य करत आहे. एच.आय.व्ही संसर्गित लोकांच्या जीवनमानाच्या दर्जा उंचवण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करणे असे कार्य केले जातात. तसेच एच.आय.व्ही संसर्गित जोडप्यांचे लग्न जुळवून देण्याचे कार्य केले जाते.

 

 

 

त्याचप्रमाणे संस्थे अंतर्गत एच.आय.व्ही सह जगणार्‍या अविवाहित जोडप्यांसाठी राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा पाटोंदा-दहिंदुले रोड मेघ मल्हार सिटी नंदुरबार येथे घेण्यात आला, या एच.आय.व्ही संसर्गित वधू वर परिचय मेळाव्यात पूर्ण महाराष्ट्रातील ६५ अविवाहित, घटस्फोटीत विधवा व विधुर एच.आय. व्ही संसर्गित वधू-वरांची नोंदणी व परिचय करण्यात आला.त्यांपैकी ६ जोडप्यांचे लग्न जुळवून देण्यात आले.तसेच आतापर्यंत सस्थेमार्फत २२ एच. आय. व्हीं संसर्गित जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आले आहे,

 

 

 

 

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय नितीन मंडलिक , वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ए.आर.टी सेंटर डॉ. प्रितम पाडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश केसवानी,  संचालक जन शिक्षण संस्था नंदुरबार बाबूलाल महाजन, जिल्हा जिल्हा एड्स नियंत्रण विभाग विश्वास सूर्यवंशी, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशा माळी,सदस्य अनिल पाटील आदी उपस्थित होते. या उपक्रमात विहान प्रकल्पाचे कर्मचारी अशोक नाईक, नितीन पाटील, प्रतीक माळी, तुषार चौधरी, लक्ष्मण कोकणी,भारती मराठे, रेखा चौधरी, संगीता माळी, आशा मराठे, संगीता महाजन,कल्पना वाघ,ललिता मराठे, दुर्गेश पाचोंदे, भट्टू गवळी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

उद्योजकांनी युवकांच्या कुशलतेचा भरघोस सॅलरी पॅकेज देवून सन्मान करावा : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

सायबर कॅफेतून लायसन्स बनवून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

Next Post
गलेगठ्ठ पगार असताना लाचेची मागणी: ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी खाजगी पंटर सह आरटीओला रंगेहाथ अटक

सायबर कॅफेतून लायसन्स बनवून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add