Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उद्योजकांनी युवकांच्या कुशलतेचा भरघोस सॅलरी पॅकेज देवून सन्मान करावा : डॉ. विजयकुमार गावित

शासनाच्या विभागीय रोजगार मेळाव्यात केले आवाहन

team by team
February 25, 2023
in राजकीय
0
उद्योजकांनी युवकांच्या कुशलतेचा भरघोस सॅलरी पॅकेज देवून सन्मान करावा : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l  प्रतिनिधी

 

नंदुरबार हा आदिवासी बहुल व दुर्गम असा जिल्हा असून इथल्या तरूणाईमध्ये असाधारण स्वरूपाची कौशल्ये आहेत, या कुशलतेला उद्योजकांनी भरघोस सॅलरी पॅकेज देवून अर्थिकदृष्ट्या योग्य सन्मान करावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

ते आज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व शासकीय तंत्रनिकेतन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित,  विजय चौधरी, प्राचार्य- सचिन पाबळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सह आयुक्त विजय रिसे, संगीता सोनवणे, काजल मच्छले आदि उपस्थित होते.

 

 

 

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, शासनाच्या विविध विभागांमार्फत युवकांना कौशल्य विकासांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या खाजगी उद्योगांमध्ये रोजगारही मिळतो, परंतु काही दिवसानंतर हे तरुण पुन्हा परत आलेले दिसतात. यांचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कुशलतेच्या तुलनेत अथवा उद्योगांनी ठरल्याप्रमाणे वेतन न देणे हे आहे. मोठ्या शहरांमध्ये अल्प वेतनावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्यंत जिकिरीचे असते, त्यामुळे युवकांच्या कुशलतेचा अर्थिकदृष्ट्या योग्य सन्मान उद्योजकांनी केल्यास कुशल युवक व उद्योग दोघांचेही भवितव्य सुरक्षित राहू शकते, असे सांगून आदिवासी विकास विभागाच्या रोजगार व करिअर विषयक विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

 

खडतर संघर्षानंतरचा आनंदाचा क्षण ; डॉ. सुप्रिया गावित

संघर्षातून शिक्षण घेत रोजगार मिळविण्यापर्यंतचा प्रवास युवकांसाठी अत्यंत खडतर असतो. रोजगारासाठी मुलाखत हा क्षण प्रत्येक युवकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण असतो. तसेच रोजगार मिळाल्यानंतर पहिला पगार मिळणे हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो, असे सांगून जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी रोजगार मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.

 

 

 

प्रत्येक युवक नंदुरबारचा ब्रँड अॅम्बेसेडर ; डॉ. हिना गावित
नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासातील शासकीय पातळीवर होणारा हा सर्वात मोठा रोजगार मेळावा असून येथील प्रत्येक तरूण मोठमोठ्या शहरांमध्ये नंदूरबारचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भविष्यात काम करणार आहे. आज येथे २५ कंपन्यांनी सहभाग घेतला असून भविष्यात अजून मोठे रोजगार मेळावे घेण्याचेही आवाहन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले.

 

 

दृष्टिक्षेपात रोजगार मेळावा…

1 १५०० पेक्षा जास्त पदांकरिता जागेवरच मुलाखत आणि नियुक्ती

2  रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी

3 स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती.

4  नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे गुजरात मधीत नामांकित २५ कंपन्याचा सहभाग

5 दहावी, बारावी, पदवी, पदविका, अॅग्रिकल्चर पदवी / पदविका अभियांत्रिकी शिक्षण, आय. टी. आय. धारकांचा मोठा सहभाग

6  सर्व प्रकारच्या पात्रता धारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध

बातमी शेअर करा
Previous Post

वीजचोरी करणाऱ्या शहाद्यातील दोघांना सहा महिन्याच्या कारावास, सत्र न्यायालयाचा निकाल

Next Post

स्तुत्य उपक्रम ; एच.आय.व्ही सह जगणार्‍या सहा  जोडप्यांचे जुळल्या रेशीमगाठी

Next Post
स्तुत्य उपक्रम ; एच.आय.व्ही सह जगणार्‍या सहा  जोडप्यांचे जुळल्या रेशीमगाठी

स्तुत्य उपक्रम ; एच.आय.व्ही सह जगणार्‍या सहा  जोडप्यांचे जुळल्या रेशीमगाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add