म्हसावद l प्रतिनिधी
हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशू विहार यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त चिंतन दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्र पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सौ.चेतना चौधरी,ज्येष्ठ शिक्षक महेंद्र फटकाळ,युवराज भामरे,स्काऊट शिक्षक नितीन साळी,गाईड शिक्षिका सौ.उज्वला चौरे,प्राथमिक विद्यामंदिराचे कब प्रमुख सतीष काटके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मान्यवर यांनी आपल्या शुभ हस्ते लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व आपल्या मनोगतातून लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जीवनाचा परिचय करून देत विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड चळवळीच्या कार्याची माहिती दिली तसेच स्काऊट गाईड चळवळीचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व पटवून दिले.यावेळी कबप्रमुख सतीष काटके,स्काऊट शिक्षक सुधाकर सूर्यवंशी व विद्यार्थी यांनी कब व स्काऊटची प्रार्थना म्हणत विविध मनोरंजनात्मक व स्काऊट गीते सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चौधरी व आभार प्रदर्शन नितीन साळी यांनी केले तर यशस्वीतेसाठी सहकार महर्षी अण्णासाहेब पि.के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिराचे सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.








