Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे  स्काऊट गाईड चिंतन दिन उत्साहात साजरा

team by team
February 23, 2023
in शैक्षणिक
0
नंदुरबार येथे  स्काऊट गाईड चिंतन दिन उत्साहात साजरा
म्हसावद l  प्रतिनिधी
22 फेब्रुवारी हा दिवस स्काउट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व  लेडी बेडन पॉवेल यांचा जन्म दिन संपूर्ण जगभरात चिंतन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. स्काऊट गाईड ही एक जागतिक शैक्षणिक चळवळ आहे. या चळवळीची स्थापना 1907 मध्ये झाली. स्काउटिंग गाइडिंग हा एक खेळ आहे. जगातील 195 पेक्षा जास्त राष्ट्रातील 4 कोटीहून अधिक स्काऊट गाईड चळवळीमध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेत आहेत. 3 वर्षाच्या बालकापासून 25 वर्षाच्या युवक युवतींकरिता संस्कारक्षम वयात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत,ते उद्याचे आदर्श चारित्र्यसंपन्न नागरिक बनावे यासाठी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा,सांस्कृतिक आदान प्रदान,ऐतिहासिक व मूल्यनिष्ठ प्रणालीसाठी सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असणारी व तिच्या मूलभूत तत्वांवर आधारलेली एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ आहे.
स्काऊट गाईड चळवळ चारित्र्य, हस्तव्यवसाय, आरोग्य व सेवा या चार मूलभूत आधारस्तंभवर आधारलेली आहे.शालेय विद्यार्थ्यांमधील उपजत कला कौशल्य गुणांची जोपासना करून त्यांना छंदातून चरिताकडे नेता यावे यासाठी स्काऊट गाईड अभ्यासक्रमाचे योजना करण्यात आली आहे. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण व संघ पद्धती हे या अभ्यासक्रमाचे गुरुकिल्ली आहे. या चळवळीची सुरुवात ज्यांनी केली अशा लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त  चिंतन दिनाचे औचित्य साधून
नंदुरबार भारत स्काऊट्स आणि गाईडस जिल्हा कार्यालयाच्या वतीने  जिल्हा कार्यालयात प्रतिमा पूजन ध्वजारोहण, सर्वधर्मीय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास स्काऊट विभागातुन धर्मेंद्र भारती, किरण त्रिवेदी, सगीर खान, रवींद्र कुवर,दिनेश वाडेकर, राजेंद्र लांडगे, अशोक शिंदे, नरेंद्र पाटील,ज्ञानेश्वर सावंत आणि गाईड विभागातून ललिता भामरे,पुनम नेरकर, संगीता पाटील,शारदा पाटील, सुषमा फुलंब्रीकर, सुनिता भोसले, पुनम पवार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन नंदुरबार भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाचे जिल्हा संघटक स्काऊट  सुधाकर साखरे, जिल्हा संघटक गाईड कविता वाघ व जिल्हा लिपिक योसेफ गावित यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

हिरा प्रतिष्ठान येथे चिंतन दिवस साजरा

Next Post

आदिवासी भागातील आरोग्यकर्मींचे वेतन वाढवणार ; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
आदिवासी भागातील आरोग्यकर्मींचे वेतन वाढवणार ; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी भागातील आरोग्यकर्मींचे वेतन वाढवणार ; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add