नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने खापर ता.अ.कुवा याठे अवैधरित्या परराज्यातील मदयाची वाहतुक करणाऱ्या ट्रकसह .३८ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा मुददेमाल जप्त केल्याची कारवाई केली आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि . १५ ,सप्टेंबर रोजी कांतीलाल उमाप , आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य श्रीमती वर्मा मॅडम संचालक ( अं व द . ) राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य मुंबई , विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ , अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , नंदुरबार युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली . मिळालेल्या गुप्त बातमीनुसार हॉटेल ओमसाईराम ढाबा , खापर ते गव्हाळी रस्त्यावर खापर ता . अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे टाटा कंपनीचा बारा चाकी ट्रक , मॉडल नंबर टाटा ट्रक ३११८ ( क्र. R.J.२३ , JB – १४९३ ) या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये फ्रूटीचे पेयाचे बॉक्स होते. सदर फ्रूटीच्या पेयाच्या बॉक्सच्या खाली परराज्यातील विदेशी मदयाचे बॉक्स दिसुन आले तेथे परराज्यातील विदेशी मदयाचे ४८५ बॉक्स सदर ट्रकमध्ये मिळुन आले . पराराज्यातील विदेशी मद्याच्ये ४८५ बॉक्स राजस्थान राज्यात निर्मीत व विक्रीसाठी होते. २२ लाख ३४ हजार ४०० रुपये एकुण किंमत , फ्रूटीचे पेयाचे एकुण ११५ बॉक्स त्याची किमत १ लाख २ हजार रुपये , तसेच टाटा कंपनीचा ट्रक १५ लाख असा एकुण ३८ लाख ५१ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी राकेश नारायणलाल जाट रा.खेडा , मोडी ता . वल्लभनगर जि.उदयपुर ( राजस्थान ), छगनलाल कालुलालजी गाडरी रा गाडरीयावास ता.वल्लभनगर जि.उदयपुर ( राजस्थान ) या दोघा इसमांना अटक करण्यात आली .असुन सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ ( अ ) ( ई ) , ८०,८१,८३ , ९० , ९ ८ ( २ ) , १०८ अन्वये करण्यात आली . सदरची कार्यवाही निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार , डी.एम.चकोर निरीक्षक बी.बी.सुर्यवशी, दुःनिरीक्षक एस आर नजन , हेमंत डी पाटील , हितेश जेठे , अविनाश पाटील , अजय रायते , हर्षल आर नांद्रे , एम.एम.पाडवी , संदीप वाघ , एम. के.पवार आदींनी यशस्वीरीत्या पार पाडली , सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक डी.एम.चकोर करीत आहे .