नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील तुवरदाळ आणि मिरचीने नंदुरबारचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे. पिकांच्या विविधतेने नटलेला जिल्हा म्हणून नंदुरबार राज्यासह देशात आणि परदेशातही प्रसिद्ध आहे.पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देऊन शेती व्यवसाय करावा तसेच शेतीला मूल्यवर्धनाची गरज आहे.शेतकरी पहिला शास्त्रज्ञ असून महिला देखील प्रथम उद्योजिका आहेत. म्हणून नाबार्डने प्रमुख उत्पादकतेला प्राधान्य दिले.असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.राजेंद्र दहातोंडे यांनी केले.
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आयोजित स्वयं सेवी संस्था कार्यकर्त्यांसाठी महिला बचत गटांसाठी उपजीविकेच्या संधी व बँक लिंकेज पिषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 14 रोजी हॉटेल डी एस के रेसिडेन्सी, येथे आयोजित करण्यात आली. याप्रसंगी पाणी फाऊंडेशनचे नंदुरबार समन्वयक भूषण ठाकरे, मशरूम उत्पादक घनःश्याम पाटील, यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविकात नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील यांनी हिंदी दिवसाचे औचित्य साधून सर्वाना शुभेच्छा दिल्या. त्यांनी नाबार्डने बचत गटांसाठी राबविलेल्या विविध योजना बद्दल माहिती दिली तसेच बचत गटांसाठी उद्यमीतेचे महत्व सांगितले. या प्रसंगी जिल्हा भरातील बचत गट बँक लिंकेजची सद्य परिस्थिती व प्रभावी बचत गट चळवळीसाठी स्वयंसेवी संस्थाची विकासात्मक भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ.राजेंद्र दहातोंडे यांनी सांगितले की, कुठेही उद्योगाला एक हजार दिवस जगवा म्हणजे तो पुढील पिढ्यानपिढ्या टिकेल.याला यंत्रणा आणि मनुष्यबळाची देखील आवश्यकता आहे.कडधान्य प्रक्रिया भाजीपाला प्रक्रिया यासाठी पारंपारिक पद्धती आधुनिक साठवणूक पद्धती, धान्य सुरक्षितता यावर ग्रामीण भागात भर देण्यात येत आहे. बचत गटांसाठी जिल्ह्यात संभाव्य उपक्रमांबद्दल माहिती दिली.
भूषण ठाकरे यांनी पाणी फौंडेशनद्वारे राबविल्या जाणाऱ्या समृद्ध गाव स्पर्धा व गावपातळीवर जल/मृदा संधाररणात स्वयंसेवी संस्थांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी या उपायजोनाचा नाबार्ड अर्थसहायति पाणलोट व इतर विकासात्मक परियोजना मध्ये स्वयंसेवी संस्थांनी प्रभावी वापर करावा असे आवाहन केले. घनःशाय्म पाटील यांनी काहटूळ गावात उभारलेल्या ऑईस्टर मशरूम या जिल्ह्यातील नवीनतम प्रकल्प बद्दल माहिती दिली. त्यांनी मशरूम व्यवसायातील बचत गटांसाठी उपजीविकेच्या संधी व क्षमता उभारणी मध्ये स्वयंसेवी संस्थाचे अपेक्षित कार्य या विषयावर संवाद साधला. डीएसए संस्थेच्या सोनाली सोनवणे यांनी घरगुती परसबागविषयी माहिती दिली.
कार्यक्रमासाठी डॉ.हेडगेवार सेवा समिती, डेव्हलोपमेंट सपोर्ट सेन्टर, लुपिन फौंडेशन, माविम, बायफ, रूरल फौंडेशन, गायत्री फाउंडेशनचे बी. के.पाटील, नाबार्डचे कर्ज विभाग प्रमुख उमेश बडगुजर, गुणवंत पाटील व इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार ललित राजपूत यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन डेव्हलोपमेंट सपोर्ट सेन्टरच्या सहयोगाने करण्यात आले .