Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

team by team
February 18, 2023
in शैक्षणिक
0
एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुंदन सोनवणे उपस्थित होते. या पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

 

यानिमित्त व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी,प्रा.छोटू बोरसे,अरुण गर्गे,प्रा.छाया बच्छाव,प्रा.सुनीता शिंदे, उर्मिला मोरे,रिटा वळवी आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशा सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील विविध घटनांचे वर्णन विद्यार्थ्यांसमोर केले, नुकतेच राज्य शासनाकडून गर्जा महाराष्ट्र माझा गीत राज्यगीत म्हणून घोषित केले असून सदर गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या गीताचे गायन शाळेतील शिक्षकांनी केले. यावेळी अंजली पवार, रश्मी अहिरे, स्वाती पावरा या विद्यार्थ्यांनी भाषण दिले. यावेळी कविता सादरीकरण करण्यात आले. यावेळी अनु वळवी व प्रज्ञा पावरा, नूतन पावरा, उत्कर्ष पाडवी,वेदिका शिंदे यांनी कवितेचे सादरीकरण केले. इयत्ता ७,८,९ वीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडाच्या सुद्धा सादरीकरण केले.

 

 

यावेळेस कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले शाहिस्तेखानाची फजिती हे नाटक, यामध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, शाहिस्तेखान, राजमाता जिजाऊ व मावळ्यांची भूमिका साकारत हुबेहूब देखावा सादर केला, यावेळी प्रमुख पाहुणे कुंदन सोनवणे यांनी सांगीतले की, इतिहास खरोखरच खूप सुदंर आहे. विद्यार्थ्यांनी याच्या आवडीने अभ्यास करावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य व पराक्रमामुळे शत्रूच्या मनात सुद्धा आदराचे स्थान निर्माण केले होते, इतिहासाच्या शिक्षकांनी सुद्धा योग्य ते संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना इतिहास शिकवला पाहिजे ह्या यामुळे विद्यार्थ्यांसमोर खरा इतिहास मांडला जातो, यानिमित्ताने शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील विविध नाण्यांचे शस्त्रांचे व गड किल्ल्यांचे सुंदर व आकर्षक देखावे माहितीसह विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले होते.

 

 

यावेळी विद्यार्थ्यांनीही अतिशय उत्सुक पणे सर्व माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष पाडवी यांनी केले तर आभार प्रदर्शन रीना वळवी यांनी मानले. कार्यक्रमाकरिता ललिता पानपाटील, विद्या सोनवणे,पूनम शिंदे,ज्योती राजपूत,शिल्पा वळवी,रोझलीन वळवी,गायत्री पाटील,प्रसाद दीक्षित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार पालिकेच्या प्रभाग क्र.14 व 18 मध्ये आज पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते साडे पाच कोटीच्या विकास कामांचे भुमिपूजन

Next Post

प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती परिवारातर्फे केदारनाथ शिवलिंग दर्शन

Next Post
प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती परिवारातर्फे केदारनाथ शिवलिंग दर्शन

प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती परिवारातर्फे केदारनाथ शिवलिंग दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add