म्हसावद l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभाग,नाशिक अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा 1,2 आणि 3 फेब्रुवारी 2023 दरम्यान महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे पार पडल्या.या स्पर्धेत नाशिक विभागातील एकूण सात प्रकल्प कार्यालयातील खेळाडू सहभागी झाले होते.
विभागीय स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुलतानपूर ता शहादा जि नंदुरबार येथील खेळाडूंनी चकमदार कामगिरी केली.सुलतानपूर येथील अर्जुन वसावे, (भालाफेक सुवर्णपदक), राधिका पावरा (उंच उडी सुवर्णपदक),रंजना पटले (3000मीटर चालणे रौप्यपदक), सुशीला राहसे (3000 मीटर धावणे रौप्य पदक),सरिता राहसे (उंच उडी कांस्यपदक), भाग्यवती पाडवी (3000मीटर चालणे कांस्यपदक) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.यापैकी चार खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक श्री कांतीलाल मोते,मुख्याध्यापक श्री नितीन दुसाने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचार यांचे सहकार्य मिळाले. एकूणच या कामगिरीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे सगळीकडेच कौतुक होत आहे.








