म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद सह अनेक गावातील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे यामुळे नागरिकांसह वाहन धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.अशा रस्त्यामुळे रोजच लहान मोठे अपघात होत असल्याचे समोर येत आहे.या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आज दि.६ फेब्रुवारी रोजी म्हसावद चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास पुढील महिन्यात हे तिव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.यावेळी
जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुभाष पाटील,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, किसान सेलचे अध्यक्ष वकील पाटील, जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष विकी पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती किशोर पाटील, जिल्हा परिषद सदस्य योगेश पवार,पंचायत समिती सदस्य सत्येनं वळवी, डॉ. जाधव ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप पावरा, गोपी पावरा,युवराज शेवाळे,ओरसिंग पटले,पवनसिंग पटले, पंचायत समिती सदस्य सदस्य इशूताई,विविध गावाचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,वाहन धारक,ग्रामस्थ, प्रमुख कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते,

आंदोलनात शहादा बांधकाम विभागाचे वळवी ,शहादा पंचायत समिती चे बांधकाम विभागाचे पवार,शहादा तहसील कार्यालयाचे अधिकारी हे आंदोलन कार्यकर्ते ना भेटून येत्या पंधरा दिवसात सर्व रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल आंदोलन कर्त्यांना यावेळी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यानी पंधरा दिवसाच्या रस्त्यांची कामाची सुरुवात करू
असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी या चौफुली वर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती चार ही राडत्यावर वाहनाची रांगा लागल्या होत्या.आंदोलनात म्हसावद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.








