Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विधी महाविद्यालयाचे निवासी रो.स.यो शिबीराचे उद्घाटन 

team by team
February 7, 2023
in शैक्षणिक
0
विधी महाविद्यालयाचे निवासी रो.स.यो शिबीराचे उद्घाटन 
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय, नंदुरबार येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने ७ दिवशीय निवासी शिबिर कोळदा ता.जि. नंदुरबार येथे आयोजित केलेले असून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक अरविंद निकम यांच्या शुभहस्ते व  न्यायाधीश  डी.व्ही.हरणे, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कोळता गावाच्या सरपंच श्रीमती मोहिनीबाई वसावे, उपसरपंच आनंदभाई, ग्रामसेवक संजय पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य भरतभाई पटेल, माजी उपसरपंच सुभाष  राजपूत, संस्थेचे उपाध्यक्ष  मनोज रघुवंशी, संस्थेचे सचिव यशवंत पाटील, समन्वयक डॉ.एम. एस. रघुवंशी, विधी महाविद्यालयातील प्राध्यापक आदि.उपस्थित होते. शिबीर हे नंदुरबार तालुका विधायक समितीचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा परिसरात करण्यात घेण्यात आले आहे.
शिबिरांतर्गत कायदा जागृती, आरोग्य मार्गदर्शन, ग्राम स्वच्छता, प्लास्टिक मुक्त अभियान इत्यादी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्राचार्य डॉ.एन.डी.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. माजी सैनिक श्री. निकम यांनी विद्यार्थ्यांना मस्करातील असलेल्या शिस्तीबद्दल जाणीव करून देत राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व कसे विकसित होते याची उदाहरणे दिली.  न्या.डी व्ही.हरणे यांनी अश्या शिबिरांमधून कायदा जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सुभाष राजपूत यांनी १९७४ मधील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील त्यांच्या सहभागाचा आठवणींना उजाळा देऊन शिबिराचे महत्व पटवून दिले. कार्यक्रम अधिकारी डॉ.के.एस मराठे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा.ललित माळी यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी, उपप्राचार्य श्री. चौधरी यांनी कार्यक्रमाचा आयोजनात मोलाचे सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे मोठे रस्ता रोको आंदोलन ,   येत्या पंधरा दिवसात कामाला सुरुवात होणार 

Next Post

मराठा पाटील समाज मंडळाचे नूतन मंगल कार्यालयाचे म. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
मराठा पाटील समाज मंडळाचे नूतन मंगल कार्यालयाचे म. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

मराठा पाटील समाज मंडळाचे नूतन मंगल कार्यालयाचे म. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026
दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add