नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुत्रांच्या माहितीनूसार, मच्छी बाजार परिसरात राहणाऱ्या जयेश सोनवणे याने बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून काल दि.3 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नंदुरबार शहरातील बोहरी मशिदला लागून असलेल्या रस्त्यावर सातपर बाबा दर्गाच्या समोर जयेश दयाराम गंगावणे रा. सां. बा. विभाग कार्यालयाच्या शासकीय निवास्थान, मच्छी बाजार, नंदुरबार याने यातील मयत अरबाज खाटीक यांच्या छातीत चाकु खुपसून त्यास गंभीर दुखापत करून जिवेठार मारले याप्रकरणी राज सलिम खाटीक रा. घरकुल जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून जयेश दयाराम सोनवणे रा. सा. बां.विभाग कार्यालयाच्या शासकिय निवास्थान मच्छी बाजार नंदुरबार याच्या विरुद्ध भादवि क ३०२ ५०६ (२) सह महा. पो. का. चे कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि रविंद्र कळमकर करीत आहेत.
दरम्यान बहिणीचा चार वर्षापूर्वी प्रेमविवाह केल्याची खदखद मनात ठेवून चाकू खुपसून खून केल्याचे सांगण्यात येत . सदर घटना घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी संतप्त जमाव जमला होता. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले. संशयित जयेश गंगावने यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कायदा आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्याची हयगय केली जाणार नाही, कोणीही अफवा पसरवू नयेत, शांतता राखावी, असे आवाहन पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी केले. दरम्यान, घटनास्थळासह परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरात तणावपूर्ण शांतता होती. कोणीही घटनेबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. दरम्यान खून केल्यानंतर संशयित आरोपी शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.