नंदुरबार l प्रतिनिधी
न्याय विभाग, भारत सरकार यांच्याकडून दिशा उपक्रमांतर्गत विधी साक्षरता व जागरुकता कार्यक्रमांसाठी राज्य ग्रामीण विभाग संस्था, यशदा पुणे यांच्याकडून विधीदूत प्रकल्पासाठी जिल्ह्यातील निवडक 50 ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी 5 व्यक्तींना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या प्रशिक्षणात ग्रामपंचायतीचे सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, बालसंरक्षण समिती अध्यक्ष, बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव व समुदाय संसाधन व्यक्तींना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येईल. 8 व 9 फेब्रुवारी,2023 या कालावधीत तळोदा तालुक्यातील बोरद, प्रतापपूर, मोड, तळवे, बुधावल, अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर, खापर, अलीविहीर, भाबलपूर, राजमोही, धडगांव तालुक्यातील सिसा, असली, खडक्या, खर्डा, राजबर्डी, नवापूर तालुक्यातील सागळी, निंबाणी, कारेघाट, वाटवी, खोकसा, लहान कडवान, विसरवाडी, केळी, बोकडझर, बिलदा, तिलासर येथील ग्रामपंचायतीचे प्रशिक्षण राहील.
तसेच 10 व 11 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत नंदुरबार तालुक्यातील न्याहली, पावला, वेळावद, ठाणेपाडा, लोय, शनिमांडळ, वडझाकण, खोंडामळी, रनाळे, दहिंदुले ब्रु, भोलर ,वाघाळे तर शहादा तालुक्यातील खेडदिगर, डोंगरगांव, कलसाडी, लोणखेडा, पुरुषोत्तम नगर, बामखेडा त.त, मंदाणा, वडाळी, कळंबू, गणोर, वडछिल, म्हसावद या ग्रामपंचायतीचे प्रशिक्षण राहील.
प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रति दिवस 100 रुपये प्रवास भत्ता, चहा व नास्ता, भोजन तसेच यशदा, पुर्ण मार्फत वाचन व लेखन साहित्य देण्यात येईल. तरी या प्रशिक्षणास निवड झालेल्या व्यक्तींनी सकाळी 9 वाजता कृषी विज्ञान केंद्र, कोळदा ता.जि.नंदुरबार येथे उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.








