म्हसावद l प्रतिनिधी
सिंदखेडा तालुक्यातील रेवाडी गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील आप्पा ढिवरे यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना महसूल व गृह विभागाला मोलाचे सहकार्य करून त्यांनी विविध क्षेत्रात आपला कार्याचा ठसा उमटवला आहे.
त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेत त्यांना कर्तव्यदक्ष आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला आप्पा ढिवरे यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे यावेळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलद शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड आदी मान्यवरांच्या उपस्थित सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.