म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पाडळदा गावात समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड शुगरद्वारा ऊस उत्पादकांना ऊस लागवड ,ऊसाचा एकरी उत्पादन वाढीसाठी करावयाच्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
आयान मल्टीट्रेड शुगर साईट समशेरपूर शुगर मिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर टापरे यांनी शेतक-यांना ऊसाच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या विविध जातींची माहिती दिली.ऊस लागवड केल्यानंतर त्वरीत ऊस क्षेत्रनिहाय त्याची नोंदणी केल्यास ऊस तोडणीचे नियोजन यशस्वी करण्यास सुलभ होते.ऊसाचे पेमेंट वेळेवर देण्याचे काम कारखाना करतो आहे.याविषयी विश्वास दिला.
मुख्य ऊस विकास अधिकारी वसंत माळी यांनी शेतक-यांना वेळेवर ऊस लागवड करण्याचे आवाहन केले.ऊस नोंदणी करतांना गटनिहाय नोंदणीचे आवाहन केले. मुख्य शेतकी अधिकारी अरविंद पाटील यांनी ऊस लागवडपूर्व आणि लागवडी नंतर रासायनिक खताची मात्रा नियोजन ,पाणी पाळ्या व बांधणीचे अचूक सुत्राबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गट प्रमुख रमेश पाटील ,गट सुपरवायझर शरद पाटील, फिल्डमन भिका ठाकरे यांनी परीश्रम घेतले.पाडळदा ,अलखेड,औंरगपूर शेत शिवारातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.