Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस दलातील 5 अमंलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षकांनी दिली पदोन्नतीची भेट

team by team
January 27, 2023
in राज्य
0
जिल्हा पोलीस दलातील 5 अमंलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षकांनी दिली पदोन्नतीची भेट

नंदूरबार l प्रतिनिधी

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 5 अमंलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त पदोन्नतीची भेट दिली.

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमलदारांच्या कल्याणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देवून प्रजासत्ताक दिनानिमित्त पदोन्नतीची भेट देण्याची संकल्पना मांडली व तात्काळ मंत्रालयीन कर्मचारी यांच्याकडून किती पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती दिली जाईल ? याची माहिती घेतली. तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांना तात्काळ पदोन्नतीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

 

 

मंत्रालयीन कर्मचारी यांच्याकडून पदोन्नतीची कार्यवाही करुन पदोन्नतीस पात्र असणाऱ्या 5 अमंलदारांना 26 जानेवारी रोजी स्वतः पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या दालनात उपस्थित राहणेबाबत कळविले.पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी त्या 5 पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक या पदावरुन पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती झाल्याचे सांगताच त्या सर्व पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले.

 

 

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एकुण 5 पोलीस नाईक यांना सेवा जेष्ठतेनूसार पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देऊन प्रजासत्ताक दिनाची भेटच दिलेली आहे.

 

 

पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील पोलीस अमलदारांना पोलीस अधीक्षक यांचे दालनात एक छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रम आयोजित करुन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पोलीस अमंलदारांना पोलीस हवालदार पदाचे फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाल्यानंतर मिळणारे वेतन व भत्ते याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलीस अधिकारी व अमलदारांचे देखील अडी-अडचणी व समस्या वेळेवेर सोडविल्या जातील.तसेच गैर कायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

 

यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी व पदोन्नती मिळालेले अंमलदार आदी उपस्थित होते.

 

 

पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झालेले
पोलीस अमंलदार
1 )पोना हिरालाल मोंग्या पाडवी, धडगांव पोलीस
ठाणे
2 ) पोना राजु धरमसिंग कोकणी, विसरवाडी पोलीस ठाणे
3) पोना भिमसिंग दामजी गावीत, पोलीस मुख्यालय, नंदुरबार
4 )पोना राजेंद्र सदाशिव गावीत, मोलगी पोलीस ठाणे
5 ) पोना गायत्री बापू पवार, पोलीस मुख्यालय,
नंदुरबार

बातमी शेअर करा
Previous Post

घरफोडी करणारे दोन अल्पवयीन 24 तासांच्या आत शहादा पोलीसांच्या ताब्यात, दिड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

नंदूरबार येथील हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post
नंदूरबार येथील हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम

नंदूरबार येथील हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add