Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

team by team
September 13, 2021
in क्राईम
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
शहादा l प्रतिनिधी
शहादा-मंदाणे मार्गावर असलेल्या कर्जोत गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भोंगरे येथील तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून या अपघात प्रकरणीअज्ञात वाहन चालका विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
  याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शहादा-मंदाणे राज्यमार्गावरील कर्जोत गावाजवळ वीटभट्टी नजीक एक तरुण रक्तबंबाळ होवून मृतावस्थेत असल्याचे रविवारी सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मयत  तरुण हा भोंगरे  येथील गणेश विजय अहिरे ( वय २२) असल्याची ओळख पटली. गणेश हा एक महिन्यापासून नंदुरबार येथे कामाला होता . शनिवार दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी भोंगरे गावाकडे मेहुण्यांसोबत प्रकाशा पर्यंत आला. तेथून तो मेहुण्यांना परत पाठवून एकटाच गावाकडे निघाला. शहादा  येथील गाडी मिळाली नसल्याने त्याने पायीच रस्ता धरला.  मिळालेल्या माहितीनुसार त्याने मंदाणे गावाकडे जाणाऱ्या वाहनांना हात देवून थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु रात्र असल्याने वाहन कोणीही  थांबविले नाही. गणेश हा रस्त्याने हात देत देत चालत राहिला. अशातच एका अज्ञात वाहन चालकाने  बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने रस्त्यावर पायी चालणाऱ्या गणेश विजय अहिरे  रा.भोंगरा, ता.शहादा यास  जोरदार धडक दिल्याने गणेश चा जागीच मृत्यू झाला.धडक दिल्यानंतर वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला.दुसऱ्या दिवशी दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी कर्जोत गावाजवळील विटभट्टीजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता परिसरात पसरली.सदर घटनेची माहिती गणेशच्या परिवाराला मिळाल्याने परिवारातील सदस्यांनी आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली.मृत पावलेला आपलाच मुलगा असल्याची खात्री पटल्यानंतर  विजय कथ्थू अहिरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालक विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे करीत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कडक अंमलबजावणी करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Next Post

पंच अग्नी आखाड्याचे महामंंत्री श्री.सोमेश्वरानंदजी महाराज यांनी घेतले श्री.दादा गणपतीचे दर्शन

Next Post
पंच अग्नी आखाड्याचे महामंंत्री श्री.सोमेश्वरानंदजी महाराज यांनी घेतले श्री.दादा गणपतीचे दर्शन

पंच अग्नी आखाड्याचे महामंंत्री श्री.सोमेश्वरानंदजी महाराज यांनी घेतले श्री.दादा गणपतीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add