नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाचे आहे .जिल्ह्यात अनेक गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालयांची उभारणी करण्यात आली परंतु ग्रामस्थांकडून त्यांचा नियमित वापर होत नसल्याने गावाबाहेर दुर्गंधी दिसून येते. परिसर स्वच्छ राहण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवक ,लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन शौचालय वापराबाबत ग्रामस्थांना सक्ती करावी .शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कडक अंमलबजावणी करावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना यांनी केले आहे.
भारत पुढील वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा हागणदारी मुक्त अधिक घोषित करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्यानुसार जिल्हा स्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व) डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम सुरू आहे आहेत.
जिल्हा हागणदारी मुक्त अधिक घोषित करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर 100 टक्के शौचालयाचा वापर होणे आवश्यक आहे. तसेच शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय किंवा शासकीय कार्यालयांमध्ये शौचालय उपलब्धता व त्याचा नियमित वापर आवश्यक आहे. गावस्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आवश्यक आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण )अंतर्गत जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये शौचालयांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. तसेच ज्या कुटुंबांकडे शौचालय उपलब्ध नाही त्यांनाही भविष्यात शौचालय उपलब्ध करून देण्याचे शासनाचे नियोजन आहे .मात्र ज्या कुटुंबधारकांकडे शौचालय उपलब्ध असूनही त्यांचा वापर होताना दिसून येत नाही, शौचालयाच्या 100 टक्के वापर केल्यास गावाबाहेर दिसणारीरे दुर्गंधी कमी होईल .तसेच उघड्यावरील हागणदारी बंद झालेस पावसाळ्यात पाणीपुरवठा योजनेच्या जलस्रोताभोवती हागनदारी मुळे साचलेले दूषित पाणी कमी होऊन साथ रोगांना अटकाव होवून ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.परिसर गाव व परिसर स्वच्छ राहण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवक ,लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन शौचालय वापराबाबत ग्रामस्थांना सक्ती करावी .शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कडक अंमलबजावणी करावी असे आवाहनही रघुनाथ गावडे यांनी केले आहे
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात गाव परिसराची स्वच्छता कायम राहावे यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे गाव कृती आराखडा तयार करण्याची कामे सुरू आहेत. याबाबत सामाजिक संस्था व तालुकास्तरावरील गट संसाधन केंद्राचे कर्मचारी यांचेमार्फत सर्वेक्षण सुरू आहे .या सर्वेक्षण वेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून गाव कृती आराखड्यात सांडपाणी व घनकचरा यांचे योग्य रीतीने नियोजन होण्यासाठी सहकार्य करावे जेणेकरून गावस्तरावर भविष्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी तयार होणारे उपांगे ही उत्तम दर्जाचे व कायमस्वरूपी टिकाऊ राहतील. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ही मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांना केले आहे.