नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मानाचा श्री.दादा गणपतीच्या दर्शनासाठी झाशी येथून पंच अग्नी आखाड्याचे महामंंत्री श्री.सोमेश्वरानंदजी महाराज हे गेल्या आठ वर्षांपासून नंदुरबार शहरात येतात त्यांनी गणेश चतुर्थीला श्री.दादा गणपतीचे दर्शन घेत उपस्थितांना आशीर्वचन प्रवचन दिले.
हरातील श्री.दादा गणपती खान्देशातील आराध्य दैवत मानले जाते. नवसाला पावणार्या दादा गणपतीला यंदा १३९ वे वर्ष आहे. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. महूराणी मठातील झाशी येथील सोमेश्वरानंदजी महाराज यांनी श्री.दादा गणपतीचे दर्शन घेतले. आरती केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे भाविकांना दर्शनही घेता येणार नाही, असे कडक नियम आहेत. अशाही परिस्थितीत मला श्री.दादा गणपतीचे दर्शन घेता आले. हे माझे परमभाग्य समजतो. १३९ वर्षे पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना होते. ही बाब छोटी नाही. त्यांचे दर्शन करण्याचे भाग्य मला लाभले, असे ते म्हणाले.