Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यासाठी जिभाऊ करंडक गौरवास्पद ः चंद्रकांत रघुवंशी

team by team
January 21, 2023
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यासाठी जिभाऊ करंडक गौरवास्पद ः चंद्रकांत रघुवंशी

नंदूरबार l प्रतिनिधी

 

 

नंदुरबारच्या नाट्यकलावंतांसाठी हस्ती-जिभाऊ करंडकच्या माध्यमातून रंगमंच उपलब्ध झाला आहे. नंदुरबार शहरासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी जिभाऊ करंडक हा गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

 

 

 

गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे, ता.जि.नंदुरबार आयोजित राज्य पुरस्कार शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ  यांच्या स्मरणार्थ दि हस्ती को-ऑप.बँक लि. प्रायोजित व रोटरी क्लब ऑफ नंदनगरी सहप्रायोजित हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उद्घाटन झाले. या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दि. हस्ती को-ऑप बँक लि. नंदुरबार शहर शाखाधिकारी नाना हरी कागणे, ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, हस्ती बँकेचे समिती चेअरमन राजेंद्रकुमार चोपडा, माजी नगरसेवक संजय मक्कनराव चौधरी, डॉ.निखिल संजय चौधरी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सैय्यद इसरार अली, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, सिने अभिनेता तथा पत्रकार रणजीत राजपूत, सिने अभिनेत्री वंदना पंडित, रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सिने अभिनेता तथा पत्रकार रणजित राजपूत यांनी देखील आपल्या मनोगतातून हस्ती जिभाऊ करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण दाभाडे यांनी मानले. शनिवारी एकूण नऊ एकांकिकांचे सादरीकरण झाले. सदर सादरीकरण रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज रविवारी रोजी दिवसभरातून एकूण ६ एकांकिका सादर होणार असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण सायंकाळी ५.३० वाजता नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हॉइस चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते होईल.

 

 

 

यावेळी हस्ती को-ऑप लि. दोंडाईचाचे चेअरमन कैलास जैन, व्यवस्थापकीय संचालक सतिष जैन, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गावीत तर मान्यवरात एस.व्ही.एन.आय.टी. सुरतचे प्रा.डॉ.शिवानंद सुर्यवंशी, नंदुरबार जि.प.चे उपमुख्य कार्यकारी नंदकिशोर सुर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार तथा नाट्य लेखक रमाकांत पाटील, मंथन डिझाईन्सचे आर्कीटेक्ट निरज देशपांडे, सिने अभिनेता अनिल मोरे, नंदुरबार निमा असोसिएशनचे सचिव डॉ.चेतन चौधरी, निलेश तंवर, शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर सचिन गोसावी यांची उपस्थिती राहणार आहेत. तसेच जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार यंदा छाया संगित साधना विद्यालय, नंदुरबारच्या संचालिका सौ.सुनिता चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. उद्या सादर होणार्‍या एकांकिका पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी असे जास्त उपस्थिती लावावी असे आवाहन आयोजक नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह आयोजन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

 

 

 

रविवारी रोजी सादर होणार्‍या एकांकिका
स.१० ते ११ भारतीय (मॅड स्टुडीओ, धुळे), स.११ ते १२ झाड, कावळा आणि प्रेयसी (ऍबस्ट्रॅक्ट आर्ट डोंबिवली), दुपारी १२ ते १ ब्लाईंड स्पेस (स्टोरीया प्रॉडक्शन, कल्याण), दु.२ ते ३ ओल्या भिंती (कलासक्त अंधेरी, मुंबई), दु.३ ते ४ द रिंग अगेन (आकार गृप, नंदुरबार), दु.४ ते ५ कंदिल (एम.जे.महाविद्यालय, जळगांव).

बातमी शेअर करा
Previous Post

एस. ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचे शानदार आयोजन 

Next Post

अ‍ॅड.विक्रांत योगेंद्र दोरकर स्कॉटलॅण्डकडे रवाना

Next Post
अ‍ॅड.विक्रांत योगेंद्र दोरकर स्कॉटलॅण्डकडे रवाना

अ‍ॅड.विक्रांत योगेंद्र दोरकर स्कॉटलॅण्डकडे रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add