नंदुरबार | प्रतिनिधी
लायन्स क्लब नंदुरबार, लायन्स फेमिना क्लब तर्फे आज राजमाता जिजाऊ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यात प्रथम क्रमांक सोमा कृष्णा ठेलारी, द्वितीय -विरबालाजी विशाल घमंडे, तृतीय-मनोज गंगाधर सोनवणे यांनी मिळवला.विजेत्यांना बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अनेक बक्षीस मिळवलेले सुप्रसिध्द कार्डीओलॉजिस्ट डॉ प्रसाद अंधारे यांच्या शुभ हस्ते बक्षीसे देण्यात आलीत.या प्रसंगी लायन्स क्लब झोन चेयरपर्सन हीना रघुवंशी, डी आर हायस्कूल चे प्राचार्य श्री.भदाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धावपटुंचे कौतुक करण्यासाठी क्लब सदस्य डॉ विजय पटेल, डॉ महेंद्रभैय्या रघुवंशी, डॉ सुहास भावसार, डॉ रविंद्र पाटील,डॉ जयंत शाह, शेखर कोतवाल, अनिल पाटील,श्रीराम मोडक यांचेसह लायन्स फेमिना क्लब अध्यक्षा शीतल चौधरी, माजी लिनेस क्लब अध्यक्षा सुप्रिया कोतवाल,क्लब सदस्य ऍड सौ रागिणी पाटील,जया जैन, सीमा मोडक आदी उपस्थित होते..
या प्रसंगी डॉ प्रसाद अंधारे यांनी धावपटू यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.या उपक्रमाचे यशस्वी आयोजन लायन्स क्लब अध्यक्ष सतीश चौधरी, सचिव उद्धव तांबोळी प्रोजेक्ट चेयरमन राहुल पाटील यांनी केले.या उपक्रमाला तरुणाईने उत्तम प्रतिसाद दिला.मेरॅथान यशस्वी करण्यासाठी शिक्षक निलेश गावित व जगदिश बच्छाव यांनी सहकार्य केले .








