नंदूरबार l प्रतिनिधी
भालेर ता. नंदुरबार येथील श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सकाळ पेपर चे भालेर बातमीदार शांताराम पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. भालेर शाळेचे मुख्याध्यापक पंकज वानखेडे, जिल्हा परिषद नगाव ,तिशी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सोनल काकुस्ते, भालेरच्या सरपंच सौ एस. पी. पाटील व प्राचार्य सौ विद्या चव्हाण उपस्थित होते.
अध्यक्षाच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.प्रदर्शनात एकूण २० उपकरणे मांडण्यात आली त्यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . त्यात पर्यावरण व विज्ञान , गणितीय विज्ञान , पर्यावरण व वाहतूक व्यवस्था, टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू अशा विषयांवर आधारित उपकरणे मांडण्यात आली . सदर प्रदर्शनाचे परीक्षण प्रमुख पाहुणे यांनी केले.
त्यात प्रथम क्रमांक कुमार मनीष अशोक पाटील, द्वितीय क्रमांक कुमार सिद्धेश मुकेश पाटील ,तृतीय क्रमांक कुमारी जिविका विकास पाटील यांचा आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक सी. के.पाटील ए.एस. पाटील , एन. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगाबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले .