नंदुरबार | प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशिलाबाई दिलीप पानपाटील यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी गावाचे लोकनियुक्त सरपंच राजू देवचंद मराठे हे होते. या निवडणुकीत उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ३ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. माघारीअंती भाजपाच्या सुशिलाबाई दिलीप पानपाटील तर शिवसेनेच्या प्रियंकाबाई हेमराज पाटील यांच्यात लढत झाली. दोन्ही उमेदवारांना समान ५ मते पडली. यावेळी सभेचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच राजु मराठे यांना आणखी एका मताचा अधिकार असल्याने त्यांच्या मतासह सुशिलाबाई दिलीप पानपाटील यांना ६ मते पडली. यात त्यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले.
निवडणूकीच्या कामकाजासाठी नंदुरबार पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता श्री.मराठे यांनी निरीक्षण केले तर रजाळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वाघ यांनी कामकाज सांभाळले. या निवडणूकीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. निवड झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली आणि राम मंदिर परिसरात डिजेच्या तालावर युवकांनी ठेका धरला. उपसरपंच निवड शांततेत पार पडल्यानंतर ग्रामपंचायत आवारात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पुढील सुरुवात करण्यात आले. यावेळी ग्रा.पं.सदस्य राकेश गायकवाड, धनसिंग भिल, मनिषा पांगारे तर शिवसेनेचे प्रियंका पाटील, महेंद्र गिरासे, मुरलीधर मराठे, निता पाटील , रेखा भिल उपस्थि होते.