नंदुरबार l प्रतिनिधी
वृक्षारोपण ही काळाची गरज असून, प्रत्येकाने या कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन नंदुरबारच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील प्रांगणात जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेची इमारत व परिसरातील वृक्षारोपण पाहून श्रीमती खत्री यांनी समाधान व्यक्त केले. परिसरातील उंच टेकड्यावर देखील वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वृक्षारोपण ही काळाची गरज असून, प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण केले पाहिजे. जेथे जेथे शक्य असेल तिथे तिथे वृक्षारोपण करून वसुंधरेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डाएटचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, रमेश चौधरी, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. वानमाला पवार, डॉ. संदीप मुळे, पंढरीनाथ जाधव, सुभाष वसावे, विषय सहायक देवेंद्र बोरसे, गोविंद वाडीले, श्रीमती रेखा तांबोळीयुजवेंद्र देवरे आदी यावेळी उपस्थित होते.