Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोटार सायकल चोरी करणाऱ्या  पाच जणांना अटक , साडे तीन लाखाच्या नऊ दुचाकी जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

team by team
January 11, 2023
in क्राईम
0
मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, ४ दुचाकी जप्त
नंदूरबार l प्रतिनिधी
मोटार सायकल चोरी करणाऱ्या संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने 5 जणांना अटक केली असून  3 लाख 35 हजार रुपये किमंतीच्या 9 दुचाकी जप्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,  8 जानेवारी 2023 रोजी पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव असे त्यांच्या न्युबन येथील एक साथीदाराच्या मदतीने तळोदा, शहादा परिसरातून मोटार सायकली चोरुन आणून शहादा येथील तौसिफ शेख यास विक्री करतात अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 1 पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयीतांवर लक्ष ठेवून माहिती घेणे सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव यांची माहिती काढली असता, दोन्ही संशयीत इसम नेहमी वेगवेगळ्या दुचाकी वाहन फिरवत असतात व त्यांना भेटण्यासाठी शहादा येथील एक अनोळखी व्यक्ती येत असतो अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 8 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास  दर्शन कांतीलाल पाटील, मयुर किशोर जाधव  दोन्ही रा. बोरद ता. तळोदा यांना ताब्यात घेत त्यांना मोटार सायकल चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी तळोदा, शहादा व म्हसावद येथे त्यांचा न्युबन येथील तिसरा साथीदार सागर चौधरी याच्या मदतीने मोटार सायकल चोरीबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच चोरी केलेल्या मोटार सायकली शहादा येथील तौसिफ शेख विक्री केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ न्युबन गाठून  सागर उदेसिंग चौधरी  रा. न्युबन ता. तळोदा या
तिन्ही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवून तौसिफ शेख याचा शोध घेतला असता तो, शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी येथून तौसिफ शेख भिकन शेख  रा. संजेरी चौक, गरीब नवाज कॉलनी, शहादा यास ही अटक केली.
त्यास दर्शन पाटील, मयुर जाधव व सागर चौधरी यांनी चोरी करुन आणून त्यास दिलेल्या मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता त्याने त्या मोटार सायकली जुना खेतिया रोड येथील गॅरेजच्या पाठीमागे लपवून ठेवल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून तेथून 2 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 7 मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत. त्याबाबत तळोदा पोलीस ठाणे, शहादा पोलीस ठाणे, म्हसावद पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत 4 मोटार बाबत माहिती घेण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एकुण 2 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 7 मोटार सायकली हस्तगत करुन 3 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
 तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या एका पथकाने 8 जानेवारी रोजी सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील टेंबे त. सा. येथील हंसराज बहादुर मालचे यास ताब्यात घेवून त्याने सारंगखेडा-टेंभा रस्त्यावरील एका नाल्याच्या पुलाखाली लपवुन ठेवलेल्या 45 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी मोटार सायकल जप्त केलेल्या आहेत. जप्त केलेल्या मोटार सायकल चोरीबाबत सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.
 ताब्यात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या 4 संशयीत आरोपीतांकडून एकुण 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 9 मोटार सायकल हस्तगत करुन मोटार सायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
 सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक बापु बागुल, सुनिल पाडवी, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार किरण मोरे, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूरात तीन ठिकाणी चोरी

Next Post

प्रत्येकाने वृक्षारोपण कार्यात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी श्रीमती खत्री

Next Post
प्रत्येकाने वृक्षारोपण कार्यात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी श्रीमती खत्री

प्रत्येकाने वृक्षारोपण कार्यात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी श्रीमती खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add