म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पाडळदा येथे घराच्या बांधकामा साठी सुरू असलेल्या खोदकाम दरम्यान 300 वर्षांपूर्वी तोफा व गाव दरवाजा ला लावले जाणारे कुलूप मिळून आल्याने हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
पाडळदा येथील अरून हरी पाटील यांच्या घराचे बांधकामासाठी मजूर खोदकाम करीत असताना त्यांना पाईप सारखी वस्तू दिसून आली त्यांनी पुन्हा खोदकाम केले असता त्यांना ऐतिहासिक तोफा आढळून आल्या मजूर सुरेश ठाकरे यांनी घरमालक यांना याची महिती दिली त्यांनी लागलीच शहादा पोलीसानी दिली.गावाचे तलाठी गायकवाड यांनी पंचनामा करून त्याची प्रशासनाला दिली.
हे ऐतिहासिक वस्तू गावात ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.या तोफा चार ते पाच फूट आकाराच्या पंचधातूंच्या व एक पितळी आहे.हे पुढच्या बाजूने गोलाकार तर मागील बाजू ने गोळा टाकण्यासाठी जागा आहे.या तोफावर काही ही लिखाण नाही.याचे वजन सहा किंटल वजनाचे आहे.ही बातमी गावात व परिसरात पसरताच या तोफा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.








