Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान :नंदुरबार जिल्ह्यात पुढील दोन दिवस थंडीची लाट, आज निच्चांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

team by team
January 9, 2023
in राज्य
0
सावधान :नंदुरबार जिल्ह्यात पुढील दोन दिवस थंडीची लाट, आज निच्चांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

नंदूरबार l प्रतिनिधी

उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. उत्तरेकडील राज्यापासुन मध्य भारतापर्यंत सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जिल्हा कृषि हवामान केंद्र कृषि विज्ञान केंद्र कोळदा नंदुरबार येथे आज दि. ९ जानेवारी रोजी निच्चांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन ते दिवस थंडीची लाट असेल आणि हवामान कोरडे राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे अशी माहिती कृषि हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली आहे.

शेतकरी बांधवांनी थंडीची लाटेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांना हलके पाणी द्यावे जेणेकरून शेताचे तापमान नियंत्रित राहील व पिकांचे नुकसान होण्यापासून वाचवता येईल. शक्य असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. साधारणपणे केळी व पपई या फळबागांच्या पिकासाठी कडाक्याच्या थंडीचा विपरीत परिणाम होऊन, नुकसान होण्याची शक्यता असते. केळी पपईच्या फळांना संरक्षणासाठी प्लास्टिक बॅगचे आवरण लावावे.

बागेच्या भोवती सजीव कुंपण लावून, थंड वार् यापासून बागेचे संरक्षण करावे. बागेमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटेच्या वेळी पाणी द्यावे ज्यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होते. झाडांच्या आळ्यात व खड्ड्यात जवळ वाळलेला पालापाचोळा टाकावा.

उसाचे पाचट किंवा गव्हाचा भुसा यांचा उपयोग करावा. त्यामुळे थंड तापमानाचा झाडाच्या मुळावर परिणाम होत नाही. तसेच थंड वाऱ्यापासून जनावरांचे, कोंबड्यांचे संरक्षण करावे. शेडमध्ये तापमान वाढवण्यासाठी बल्ब लावावेत आणि शेडला पडदे लावावेत. जनावरांना उर्जा व प्रथिनेयुक्त पशु आहाराचा समावेश करून आहार वाढवावा असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्राने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पाडळदा येथे खोदकामात आढळल्या दहा ऐतिहासिक तोफा, सर्व तोफा आहेत पंचधातूच्या

Next Post

२२ उपसा सिंचन योजनांची कामे सुरू न झाल्यास शेतकर्‍यांचा २६ जानेवारी जलसमाधीचा ईशारा

Next Post
२२ उपसा सिंचन योजनांची कामे सुरू न झाल्यास शेतकर्‍यांचा २६ जानेवारी जलसमाधीचा ईशारा

२२ उपसा सिंचन योजनांची कामे सुरू न झाल्यास शेतकर्‍यांचा २६ जानेवारी जलसमाधीचा ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add